शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

१४ वर्षीय मुलीचा लावला बालविवाह! आष्टी तालुक्यातील धक्कादायक प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2023 14:12 IST

अंमळनेर पोलीसांनी घटनास्थळी भेट दिली असून सदरील ग्रामसेवकाला याची माहीती दिली आहे. 

- नितीन कांबळे

कडा- अवघ्या १४ वर्ष वय असलेल्या एका मुलीचा बालविवाह गावातीलच एका ड्रायव्हर तरूणासोबत मंगळवारी लावून दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ती अल्पवयीन मुलगी कोण?तिचा विवाह कोणी लावला,कुटुंबातील लोकाना काय आमिष दाखवले हा प्रश्न उपस्थित केला जात आहे. अंमळनेर पोलीसांनी घटनास्थळी भेट दिली असून सदरील ग्रामसेवकाला याची माहीती दिली आहे. 

आष्टी तालुक्यात मोठ्या प्रमाणात बालविवाह होत असल्याच्या घटना घडत असताना याकडे प्रशासन मात्र दुर्लक्ष करताना दिसत आहे.लग्न सराईत होणारे विवाह यात नवरीचे वय किती काय याची कोणीच विचारणा करत नसल्याने राजरोस पणे बालविवाह लावले जात आहेत. तालुक्यातील हातोला येथे मंगळवारी आठवीच्या वर्गात शिक्षण घेत असलेल्या एका अल्पवयीन मुलीचा विवाह गावातीलच एका ड्रायव्हर तरुणा सोबत सकाळी अकराच्या सुमारास पार पडला. अंमळनेर पोलीसांना ही गोपनीय माहिती मिळताच त्यानी  घटनास्थळी धाव घेऊन चौकशी अंती बालविवाह झाल्याची त्याना माहिती मिळाली. त्यानी या प्रकरणी गावच्या ग्रामसेवकाला माहीती देऊन पोलीस ठाण्यात बोलवले आहे.पण अद्याप ग्रामसेवक पोलीस आले नाहीत.मग बालविवाहाला पाठीशी घालणाऱ्या ग्रामसेवकावर देखील आता गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली जात आहे.

महिन्यांत पाचवा बालविवाह झाल्याची चर्चा हातोला व परिसरात डिसेंबर महिन्यांत हा पाचवा बालविवाह झाल्याची चर्चा असून याकडे अद्याप कोणीच लक्ष दिले नाही.गावासह परिसरात याची चौकशी केल्यास धक्कादायक माहिती पुढे येऊ शकते असे येथील एका ग्रामस्थाने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. याबाबत येथील ग्रामसेवक पठाण यांना विचारणा केली असता ते म्हणाले की, मी माहिती घ्यायलाच चाललो आहे.सध्या गाडी चालवतोय थोड्या वेळात फोन करतो असे सांगून फोन ठेवला.

गुन्हा दाखल करण्यात येईल याबाबत अंमळनेर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक चंद्रकांत गोसावी यांना विचारणा केली असता ते म्हणाले की,बालविवाह झालाय अशी गोपनीय माहिती मिळाली असून घटनास्थळावरून आम्ही जाऊन आलो आहोत. सदरील गावचे ग्रामसेवक यांना माहिती दिली असून ते काय अद्याप फिर्याद देण्यासाठी आले नसून ते येताच गुन्हा दाखल करण्यात येईल असे  यांनी लोकमतला सांगितले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीmarriageलग्नBeedबीड