आईवर विळ्याने वार करून मुलाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:13 IST2021-09-02T05:13:03+5:302021-09-02T05:13:03+5:30

माजलगाव : कौटुंबिक वादातून आईच्या मानेवर विळ्याने वार करून मुलाने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. ही थरारक घटना तालुक्यातील ...

Child commits suicide by stabbing mother | आईवर विळ्याने वार करून मुलाची आत्महत्या

आईवर विळ्याने वार करून मुलाची आत्महत्या

माजलगाव : कौटुंबिक वादातून आईच्या मानेवर विळ्याने वार करून मुलाने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. ही थरारक घटना तालुक्यातील माली पारगाव येथे १ सप्टेंबर रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास घडली. आईची प्रकृती गंभीर असून, तिच्यावर उपचार सुरू आहेत.

बापू मच्छिंद्र कदम (३०) असे मयत मुलाचे नाव असून, आई पारूबाई मच्छिंद्र कदम (५०) जखमी आहे. कौटुंबिक कारणावरून माय-लेकात सतत भांडणे होत. १ सप्टेंबर रोजी दुपारी दीड वाजता त्यांच्यात शाब्दिक चकमक उडाली. त्याचे पर्यावसान कडाक्याच्या भांडणात झाले. यावेळी चिडलेल्या मुलाने विळ्याने आईच्या मानेवर वार केला. या हल्ल्यात आई गंभीर जखमी झाली. त्यांना माजलगावच्या ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले.

या घटनेनंतर घाबरलेल्या बापू कदम याने माली पारगाव शिवारात एका झाडाला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ग्रामीण ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नीलेश इधाते व सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली.

-------

तीन बायकांचा दादला

बापू कदम हा मनमानी वागत होता. त्याने तीन लग्न केले होते. दोन पत्नी सोडून गेल्यानंतर आठ दिवसांपूर्वीच त्याने पाथरी (जि.परभणी) येथील एका मुलीशी संसार थाटला होता. त्याच्या अशा वागण्याला संपूर्ण कुटुंब वैतागले होते.

....

Web Title: Child commits suicide by stabbing mother