शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

विविध योजनांच्या शुभारंभ, लोकार्पण सोहळ्यास मुख्यमंत्री आज बीडमध्ये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 05, 2019 11:56 PM

शहरातील नगरपरिषदेच्या माध्यमातून राबवण्यात येणाऱ्या ४०० कोटी रुपयांच्या विविध योजना शुभारंभ व विकास कामांचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बुधवारी होणार आहे.

ठळक मुद्देन.प.च्या माध्यमातून ४०० कोटींची कामे : जिल्हा रुग्णालयाच्या इमारतीचे भूमिपूजन

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : शहरातील नगरपरिषदेच्या माध्यमातून राबवण्यात येणाऱ्या ४०० कोटी रुपयांच्या विविध योजना शुभारंभ व विकास कामांचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बुधवारी होणार आहे. तसेच जिल्हा रुग्णालयात महिला व शिशू विभागासाठी १०० खाटांची नवीन इमारतीच्या बांधकामाचे भूमिपूजन देखील करण्यात येणार आहे.यावेळी पालकमंत्री पंकजा मुंडे, खा. प्रीतम मुंडे, नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर, आ. जयदत्त क्षीरसागर, आ. संगीता ठोंबरे, सुरेश धस, सतीश चव्हाण, विक्रम काळे, आर.टी.देशमुख,भीमराव धोंडे, लक्ष्मण पवार, माजी.आ.बदामराव पंडीत, नंदकिशोर मुंदडा यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. यावेळी शहरात १६८ कोटी रुपयांची अटल भूयारी गटार योजना, ८८ कोटी रुपयांचे नवीन १६ डीपी रोडचे बांधकाम, प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून ४४८ घरांची निर्मिती, न.प.च्या सभागृहाला स्व.गोपीनाथराव मुंडे नामकरण यासह जिल्हा रुग्णालायत महिला व शिशुंसाठी १०० खाटांच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन व मराठवाड्यातील पहिल्या निवारा केंद्राचे लोकर्पण असे विविध कार्यक्रम होणार आहेत. बुधवारी सकाळी १० वाजता मल्टीपर्पज ग्राऊंडवर शहरातील नागरिक, कार्यकर्ते व पदाधिकाºयांनी उपस्थित राहण्याचे आवाहन नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर, न.प. सभापती व नगरसेवकांनी केले आहे.पद्मश्री पुरस्कार प्राप्त व खेळाडूंचा होणार सन्माननुकताच बीड जिल्ह्याच्या दोन सुपुत्रांना त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कामाबद्दल भारत सरकारच्या वतीने पद्मश्री पुरस्कार देण्यात आला आहे. यामध्ये डॉ.वामन केंद्रे व शब्बीर शेख यांच्यासह कुस्तीपटू राहुल आवारे, क्रिकटपटू सचिन धस यांचा देखील मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये सन्मान करण्यात येणार आहे.शहरातील विविध भागात स्वच्छता मोहीममुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बीड शहरात येणार आहेत, त्यामुळे शहरातील रस्त्यावरचे खड्डे बुजवण्यात आले आहेत. तसेच रस्त्यालगतचे अतिक्रमण देखील हाटवण्यात आले असून, गटारी, रस्त्यावरील कचरा व माती झाडून स्वच्छता करण्यात आली आहे. त्यामुळे शहरातील वातावरण प्रसन्न झाल्याचे दिसून आले, अशाच प्रकारे रोज स्वच्छता करण्यात यावी असे मत शहरातील नागरिकांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.

टॅग्स :BeedबीडChief Ministerमुख्यमंत्रीBeed civil hospitalजिल्हा रुग्णालय बीड