शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज गोपीनाथ गडावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2019 00:13 IST

लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या पाचव्या स्मृती दिनानिमित्त ३ जून रोजी होणाऱ्या कार्यक्र माची जय्यत तयारी गोपीनाथ गडावर झाली आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विविध मंत्री, खासदार, आमदार लोकनेत्याच्या अभिवादनासाठी येत आहेत.

ठळक मुद्देमराठवाड्यातील नवनिर्वाचित खासदारांचा सत्कार : तरुणांसाठी रोजगार मेळावा

परळी : लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या पाचव्या स्मृती दिनानिमित्त ३ जून रोजी होणाऱ्या कार्यक्र माची जय्यत तयारी गोपीनाथ गडावर झाली आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विविध मंत्री, खासदार, आमदार लोकनेत्याच्या अभिवादनासाठी येत आहेत. ग्रामीण भागातील तरूणांसाठी रोजगार मेळावा व भाजपा शिवसेना महायुतीच्या मराठवाड्यातील सर्व नवनिर्वाचित खासदारांचा सन्मान गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने होणार आहे.सोमवारी सकाळी ११ वाजता रामायणाचार्य ह.भ.प. ढोक महाराज यांचे सुश्राव्य कीर्तन होणार असून, दुपारी १ वाजता गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान व पंडित दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य विकास योजनेच्या वतीने आयोजित रोजगार मेळाव्याचे उद्घाटन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते करण्यात येणार आहेत.केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, पशुसंवर्धन व दुग्ध विकास मंत्री महादेव जानकर तसेच अन्य मंत्री यावेळी उपस्थित राहणार आहेत. मराठवाड्यातील भाजपा शिवसेना महायुतीच्या सर्व नवनिर्वाचित खासदारांचा यावेळी गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने सत्कार करण्यात येणार आहे.रोजगार मेळावागोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानने यंदा ग्रामीण भागातील तरूणांसाठी रोजगार मेळावा आयोजित केला आहे. किमान दहावी उत्तीर्ण झालेल्या बीड जिल्हयातील ५ हजार विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे. व्यावसायिक शिक्षणाबरोबरच त्यांच्या आवडीचा कोर्स एखाद्या नामांकित कंपनीत मानधन तत्वावर जॉब देऊन पूर्णकेला जाणार आहे. पुण्याची यशस्वी ही संस्था सहकार्य करणार आहे.कोर्स पूर्ण झाल्यानंतर मिळालेल्या प्रमाणपत्राच्या आधारे त्याला चांगला रोजगार मिळू शकेल अशी व्यवस्था पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या पुढाकाराने करण्यात आली आहे.

टॅग्स :BeedबीडDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसPankaja Mundeपंकजा मुंडे