नदीत झुडपे वाढल्याने पात्र अरूंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:37 IST2021-05-25T04:37:30+5:302021-05-25T04:37:30+5:30
रस्त्याचा प्रश्न मार्गी लावावा माजलगाव : तालुक्यातील जायकोचीवाडी या गावचा रस्त्याचा प्रश्न अनेक दिवसांपासून रखडलेला आहे. जायकोचीवाडी ते खामगाव ...

नदीत झुडपे वाढल्याने पात्र अरूंद
रस्त्याचा प्रश्न मार्गी लावावा
माजलगाव : तालुक्यातील जायकोचीवाडी या गावचा रस्त्याचा प्रश्न अनेक दिवसांपासून रखडलेला आहे. जायकोचीवाडी ते खामगाव पंढरपूर डांबरी रस्ता व पाणंद रस्ता अत्यंत बिकट झालेला आहे. या रस्त्याच्या समस्येबाबत निवेदनही दिले आहे. रस्त्याचा प्रश्न अद्याप मार्गी लागलेला नाही. या रस्त्यावरून प्रवास करताना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.
कलावंतांना नियमित मानधन मिळावे
बीड : कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदीमुळे अनेक लोककलावंत दयनीय अवस्थेत जगत आहेत. त्यांना आर्थिक मदतीची नितांत गरज आहे. वयोवृद्ध कलावंतांना वेळेवर मानधन मिळावे. यासाठी शासनस्तरावर प्रयत्न व्हायला हवेत. अशी मागणी होत आहे.
पेट्रोल दरवाढीमुळे वाहनचालकांना त्रास
बीड : पेट्रोल व डिझेलचे भाव मोठ्या प्रमाणात वाढल्याने वाहनचालकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. पेट्रोल, डिझेलच्या भाववाढीमुळे सामान्य नागरिकांचे बजेट कोलमडले असून पेट्रोल-डिझेलची दरवाढ मागे घ्यावी, अशी मागणी नागरिक, वाहनधारकांमधून होत आहे.
फॅन्सी मास्क बाजारात
बीड : कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे व नागरिकांनी दक्षता बाळगावी यासाठी आरोग्य प्रशासन व जिल्हा प्रशासन यांच्यावतीने जनजागृती मोहीम सुरू आहे. मास्कचा वापर करण्याबद्दल सक्ती केली जात आहे. शहरवासीयांनी बाजारात मास्क खरेदीसाठी सुरुवात केली आहे. ग्राहकांची मास्क खरेदीसाठी असलेली मोठी पसंदी यामुळे बाजारात फॅन्सी मास्क मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी आले आहेत.