एकाच रात्रीत तीन घरफोड्या, पोलिसांना आव्हान
By Admin | Updated: July 17, 2017 18:31 IST2017-07-17T18:31:45+5:302017-07-17T18:31:45+5:30
माजलगाव येथील सन्मित्र कॉलनी येथे आज पहाटे १ ते ४ वाजे दरम्यान चोरटयांनी चाकुचा धाक दाखवत तिन ठिकाणी घरफोडया केल्या.

एकाच रात्रीत तीन घरफोड्या, पोलिसांना आव्हान
ऑनलाईन लोकमत
बीड/माजलगांव : माजलगाव येथील सन्मित्र कॉलनी येथे आज पहाटे १ ते ४ वाजे दरम्यान चोरटयांनी चाकुचा धाक दाखवत तिन ठिकाणी घरफोडया केल्या. यात ५० हजाराचा ऐवज चोरीस गेला असून एकाच रात्रीत झालेल्या तीन फोड्या या पोलिसांना आव्हान ठरत आहेत.
रविवारी शहरात पाऊस असल्याने सन्मित्र कॉलनीत नागरिकांची गस्त नव्हती. हीच संधी साधून चोरटयांनी प्रथम पत्रकार पुरुषोत्तम करवा यांच्या घराच्या चॅनल गेटचे कुलुप तोडुन घरात प्रवेश केला. दुस-या मजल्यावरील रुमच्या कडया लावुन गोडावुन मधील दहा हजाराच माल चोरी केला. दरम्यान करवा यांच्या मुलाला जाग आल्याचे पाहुन चोरांनी येथुन पोबारा केला.
यानंतर त्यांनी संजय देशमुख यांच्या घराचे कुलुप तोडुन घरात प्रवेश केला मात्र त्या ठिकाणी चोरांना कांहीच हाती लागले नाही म्हणून त्यांनी समोरच असलेल्या दिनेश प्रभुणे यांच्या घरात पाठीमागील दरवाजाची कडी प्रवेश केला. यावेळी प्रभुणे यांना चाकुचा धाक दाखवुन त्यांच्या पत्नीच्या गळयातील मंगळसुत्र व कानातील दीडतोळे दागिने, मोबाईल व नगदी चार हजार रुपये असा एकुण 40 हजारांचा मुददेमाला घेऊन ते पसार झाले. दरम्यान, करवा व प्रभुणे यांच्या फिर्यादीवरून पोलिसात अज्ञात चोरटयांविरुध्द गुन्हा दाखल झाला असुन पी.एस.आय. तानाजी शिनगारे हे पुढील तपास करत आहेत. एकाच रात्रीत झालेल्या या धाडसी घराफोडीने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले असून हे एक प्रकारे पोलिसांना आव्हानच ठरले आहे.