‘त्या’ बालिकेच्या आईचा शोध लावण्याचे पोलिसांसमोर आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 04:23 IST2021-07-10T04:23:39+5:302021-07-10T04:23:39+5:30

देवीच्या मंदिर आवारात बुधवारी मध्यरात्री आठ दिवसाच्या स्त्री जातीचे नवजात बालक बेवारस अवस्थेत रडताना आढळून आले. माहिती मिळताच पोलीस ...

The challenge for the police is to find the mother of 'that' girl | ‘त्या’ बालिकेच्या आईचा शोध लावण्याचे पोलिसांसमोर आव्हान

‘त्या’ बालिकेच्या आईचा शोध लावण्याचे पोलिसांसमोर आव्हान

देवीच्या मंदिर आवारात बुधवारी मध्यरात्री आठ दिवसाच्या स्त्री जातीचे नवजात बालक बेवारस अवस्थेत रडताना आढळून आले. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी आले. त्या नवजात मुलीची आष्टी ग्रामीण रुग्णालयात तपासणी करून बीडला पाठवून अज्ञाताविरोधात पोलीस हेड काॅन्स्टेबल विठ्ठल थोरवे याच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल केला; पण आता ते नवजात अर्भक कोणी सोडले, तिची आई कोण, कोणत्या कारणामुळे सोडले, याचा उलगडा करून त्या बालिकेच्या आईचा शोध लावण्याचे आव्हान अंभोरा पोलिसांसमोर आहे.

याबाबत अंभोरा पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक ज्ञानेश्वर कुकलारे यांना विचारणा केली असता, ते म्हणाले की, परिसरातील अंगणवाडी सेविका, खासगी, सरकारी रुग्णालयात पंधरा दिवसांत किती मातेने बालकांना जन्म दिला, याची माहिती घेणे सुरू असून, लवकरच सत्य समोर येईल, असे ‘लोकमत’ला त्यांनी सांगितले.

Web Title: The challenge for the police is to find the mother of 'that' girl