धारूरमध्ये चक्का जामने वाहतूक ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:21 IST2021-06-27T04:21:56+5:302021-06-27T04:21:56+5:30
धारूर : येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये भाजपच्या वतीने ओबीसीच्या आरक्षणासाठी भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य नगराध्यक्ष डॉ.स्वरूपसिंह हजारी यांच्या ...

धारूरमध्ये चक्का जामने वाहतूक ठप्प
धारूर : येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये भाजपच्या वतीने ओबीसीच्या आरक्षणासाठी भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य नगराध्यक्ष डॉ.स्वरूपसिंह हजारी यांच्या नेतृत्वाखाली चक्का जाम रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यामुळे दोन तास वाहतूक ठप्प झाली होती.
बीड जिल्ह्याच्या माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्या आदेशाने ओबीसीच्या आरक्षणासाठी धारूर येथील छत्रपती शिवाजी चौकामध्ये रास्ता रोको करून चक्का जाम आंदोलन करण्यात आले. यावेळी ‘शासनाची खेळी, ओबीसी आरक्षणाचा बळी’ अशा घोषणा देण्यात आल्या. मागण्यांचे निवेदन नायब तहसीलदार रामेश्वर स्वामी यांच्याकडे देण्यात आले.
यावेळी उदयसिंह दिख्खत, दत्तात्रय धोतरे, ॲड.मोहन भोसले, ॲड.बालासाहेब चोले, चोखाराम गायसमुद्रे, संतोष सिरसट, सुरेश लोकरे, रोहित हजारी, सुदाम बडे, बाळासाहेब गायकवाड, लक्ष्मण शेटे, शिवाजी मायकर, महादेव तोंडे, बालासाहेब जाधव, शिवाजी मुंडे यांच्यासह भाजप कार्यकर्ते उपस्थित होते. पोलीस निरीक्षक सुरेखा धस यांनी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवला होता.