शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याणीनगर हिट अँड रन प्रकरण: बिल्डर विशाल अगरवालला अखेर अटक; पुणे पोलिसांची कारवाई
2
क्रूरतेचा भागीदार! इराणने मदत मागितलेली, रईसी यांच्या शोधासाठी अमेरिकेने नकार दिला
3
विराेध असूनही रईसी यांनी इराणला नेले समृद्ध युरेनियमजवळ
4
चेन्नईला बुडविले, तसेच टीम इंडियाला टी20 वर्ल्ड कपमध्येही नाही बुडवले म्हणजे झाले, एवढ्या खराब फॉर्मात
5
आजचे राशीभविष्य, २१ मे २०२४ : मन प्रसन्न राहिल, कामे सफल होतील पण आरोग्याची काळजी घ्यावी लागेल!
6
अर्धे मतदार गेले तरी कुठे? महाराष्ट्रात ५४.३३ टक्के, तर देशात सरासरी ६०.३९ टक्के मतदान
7
मतदान कमी, गोंधळ जास्त, मुंबईत अनेक ठिकाणी ईव्हीएम यंत्रणा बंद, मतदार यादीत नाव शोधताना नाकीनऊ
8
पोलिसांनी अतिरेकी हल्ल्याचा कट उधळला; अहमदाबाद विमानतळावर चार दहशतवाद्यांना अटक
9
मी दारू पितो, माझ्याकडे परवाना नाही; तरीही वडिलांनीच कार दिली; ‘ब्रह्मा ग्रुप’चे विशाल अग्रवाल यांच्यासह चार जणांवर गुन्हा
10
इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू; मृतांमध्ये परराष्ट्रमंत्र्यांसह अधिकाऱ्यांचाही समावेश
11
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
12
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
13
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
14
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
15
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
16
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
17
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
18
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
19
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
20
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका

दारूसाठी पैसे देण्यास नकार दिल्याने चाकूहल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2018 12:31 AM

बीड : दारूसाठी पैसे देण्यास नकार देताच एकाने गावातील व्यक्तीवर चाकूने हल्ला करून गंभीर जखमी केले. तसेच त्याच्या खिशातून दोन हजार रुपये काढून घेतले. ही घटना पोळ्याच्या दिवशी आष्टी तालुक्यातील घाटा (पिंप्री) येथे घडली.घाटा (पिंप्री) येथील दिगंबर गंगाराम घोडके (वय ४५) हे पोळ्याच्या दिवशी सायंकाळी ६ वाजता घाटा (पिंप्री) फाट्यावरून ...

बीड : दारूसाठी पैसे देण्यास नकार देताच एकाने गावातील व्यक्तीवर चाकूने हल्ला करून गंभीर जखमी केले. तसेच त्याच्या खिशातून दोन हजार रुपये काढून घेतले. ही घटना पोळ्याच्या दिवशी आष्टी तालुक्यातील घाटा (पिंप्री) येथे घडली.

घाटा (पिंप्री) येथील दिगंबर गंगाराम घोडके (वय ४५) हे पोळ्याच्या दिवशी सायंकाळी ६ वाजता घाटा (पिंप्री) फाट्यावरून घराकडे परतत होते. रस्त्यात गावातील संदीप माणिक झांजे हा भेटल्याने घोडके त्याच्या घरासमोर त्याला बोलत थांबले. संदीपने दारूसाठी पैसे देण्याची मागणी घोडके यांच्याकडे केली. घोडके यांनी नकार देताच संदीपने हातातील चाकूने त्यांच्या मानेवर वार केला. परंतु, घोडके यांनी प्रसंगावधान राखत वार चुकविल्याने चाकू त्यांच्या डोळ्याशेजारी लागून गंभीर इजा झाली.

यावेळी रक्तबंबाळ अवस्थेतील घोडके यांच्या खिशातून संदीपने दोन हजार रुपये काढून घेतले. घोडके यांचा आरडाओरडा ऐकून त्यांची पत्नी आणि इतर ग्रामस्थ धावत तेथे आले. तोपर्यंत संदीपने तेथून पळ काढला. या हल्ल्यात घोडके यांना २५ टाके पडले असून सध्या त्यांच्यावर अहमदनगर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याप्रकरणी दिगंबर घोडके यांच्या तक्रारीवरून संदीप झांजे याच्यावर अंभोरा पोलिसांत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

टॅग्स :BeedबीडCrime Newsगुन्हेगारीMarathwadaमराठवाडा