केंद्रीय आरोग्य पथकाची कुसलंबला भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:33 IST2021-04-11T04:33:30+5:302021-04-11T04:33:30+5:30
जागतिक आरोग्य संघटनेच्या अंतर्गत केंद्रीय आरोग्य पथक दिल्लीच्या सदस्यांनी यावेळी सद्य:स्थितीत उद्भवलेल्या भयानक कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर कुसळंबला भेट देऊन ...

केंद्रीय आरोग्य पथकाची कुसलंबला भेट
जागतिक आरोग्य संघटनेच्या अंतर्गत केंद्रीय आरोग्य पथक दिल्लीच्या सदस्यांनी यावेळी सद्य:स्थितीत उद्भवलेल्या भयानक कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर कुसळंबला भेट देऊन पाहणी केली.
यावेळी येथील ग्रामपंचायत कार्यालयामध्ये विविध शासकीय वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या समवेत येथील सरपंच व प्रमुख व्यक्तींशी संवाद साधून मार्गदर्शक सूचना केल्या.
यावेळी बोलताना या पथक सदस्यांनी मार्गदर्शन करताना शक्यतो शासकीय दवाखान्यात उपचार घ्या, अस्वस्थ वाटल्यास प्रथमदर्शनीच उपचाराला सुरुवात करा. अंगावर दुखणे काढू नका, अशा सूचना दिल्या.
या केंद्रीय पथकाच्या समवेत बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार, पाटोदाचे गटविकास अधिकारी अनंत्रे, तहसीलदार मुंडलोड, उत्पादन शुल्कचे अधीक्षक नितीन धार्मिक, पाटोदा पोलीस ठाण्याचे सपोनि महेश आंधळे, डीएचओ. डॉ. राधाकिसन पवार, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.लक्ष्मीकांत तांदळे, वाहली प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. चैताली भोंडवे व आरोग्य कर्मचारी तसेच सरपंच शिवाजीराव (मेजर) पवार, ग्रामसेवक वाघमारे आदींसह प्रमुख व्यक्ती व मान्यवर कुसलंबचे ग्रामस्थ उपस्थित होते.
पथकाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करू
आज कुसळंब येथे केंद्रीय आरोग्य पथकाच्या वरिष्ठ सदस्यांनी येथे भेट दिली. पाहणी केली तसेच विविध प्रकारच्या सूचनाही केल्या. ग्रामस्तरावर ग्रामपंचायतीच्या वतीने स्वच्छता, लसीकरण तसेच शासन व आरोग्य विभागाच्या नियमांचे पालन सर्व ग्रामस्थांच्या सहकार्याने करण्यात येईल.
- मेजर शिवाजीराव पवार, सरपंच, कुसळंब.
===Photopath===
100421\10_2_bed_20_10042021_14.jpg
===Caption===
केंद्रीय आरोग्य पथकाच्या डॉ. रक्षा कुंडल आणि डॉ. अरविंदसिंह कुशवाह यांच्या पथकाने १० एप्रिल रोजी पाटोदा तालुक्यातील कुसळंब गावाला भेट देऊन पाहणी केली.