केंद्रीय आरोग्य पथकाकडून केजच्या कोविड सेंटरची पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 04:33 AM2021-04-10T04:33:31+5:302021-04-10T04:33:31+5:30

बीड जिल्ह्यात सध्या वाढत असलेला कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्हा आरोग्य प्रशासनाने कोरोना संसर्ग रोखण्यासाठी योग्य ते पाऊल ...

Central Health Squad inspects Cage's Kovid Center | केंद्रीय आरोग्य पथकाकडून केजच्या कोविड सेंटरची पाहणी

केंद्रीय आरोग्य पथकाकडून केजच्या कोविड सेंटरची पाहणी

googlenewsNext

बीड जिल्ह्यात सध्या वाढत असलेला कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्हा आरोग्य प्रशासनाने कोरोना संसर्ग रोखण्यासाठी योग्य ते पाऊल उचलत कोरोना आटोक्यात आणण्यासाठी आरोग्य प्रशासन शर्थीचे प्रयत्न करीत असल्याचे केंद्रीय पथकाला आढळून आले. या पथकाने केज येथील पिसेगाव येथे सुरु असलेल्या कोविड सेंटरचे कामही अतिशय चांगले व ऊत्कृष्ट असल्याचा निर्वाळा केंद्रीय आरोग्य पथकाचे डॉ. अरविंदसिंग कुशावह यांनी पत्रकारांशी बोलताना दिला.

केज येथील कोविड सेंटरला केंद्रीय आरोग्य पथकाने ९ एप्रिल रोजी सकाळी भेट देऊन कोरोना सेंटरची पहाणी केली. येथे सध्या रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांंसोबत पथकाने संवाद साधून कोविड सेंटरमधील आरोग्य सुविधा व इतर सोयी सुविधाबाबत माहिती घेऊन समाधान व्यक्त केले. यानंतर पत्रकारांशी पथकाने संवाद साधत केजच्या कोविड सेंटरचे काम चांगले असल्याचा निर्वाळा देत या सेंटरला गरज वाटल्यास किंवा तशी परिस्थिती उदभवल्यास येथे आणखी वाढीव बेडसाठी परवानगी देण्यात येत असल्याचेही यावेळी पथकाने सांगितले. नवीन काही उपाययोजना करता येतात का ते पाहण्यासाठी आम्ही आलो असल्याचे यावेळी पथकाने पत्रकारांशी बोलताना सांगितले.

यावेळी केंद्रीय आरोग्य पथकाचे प्रमुख डॉ. रक्षा कुंदल,डॉ. अरविंद सिंग कुशावाह,यांच्या सह बीडचे जिल्हाधिकारी डॉ. रवींद्र जगताप, बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सूर्यकांत गिते, केजचे तहसीलदार दुलाजी मेंढके, नायब तहसीलदार सचिन देशपांडे, वैद्यकीय अधिक्षक डॉ.संजय राऊत, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.विकास आठवले, तसेच कोविड सेंटरचे प्रमुख नोडल अधिकारी डॉ.दत्तात्रय चाटे, डॉ.श्रीकृष्ण नागरगोजे, डॉ.बचूटे, तसेच नगरपंचायतचे सय्यद अन्वर, सय्यद अतिक, यांच्या सह पोलिस, महसूल आणि आरोग्य विभागाचे सर्व अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

===Photopath===

090421\deepak naikwade_img-20210409-wa0023_14.jpg

===Caption===

केंद्रीय आरोग्य पथकाकडून केजच्या कोविड सेंटरची पाहणी करण्यात आली.

Web Title: Central Health Squad inspects Cage's Kovid Center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.