अपर जिल्हाधिकारी कार्यालय अंबाजोगाई येथे जागतिक चिमणी व वन दिन साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:31 IST2021-03-24T04:31:22+5:302021-03-24T04:31:22+5:30

येथील अपर जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात १७ गुंठ्यांमध्ये ४२ प्रकारच्या विविध ४६०० रोपांची लागवड मियावाकी वृक्ष लागवड पद्धतीचा ...

Celebration of World Chimney and Forest Day at Additional Collector Office, Ambajogai | अपर जिल्हाधिकारी कार्यालय अंबाजोगाई येथे जागतिक चिमणी व वन दिन साजरा

अपर जिल्हाधिकारी कार्यालय अंबाजोगाई येथे जागतिक चिमणी व वन दिन साजरा

येथील अपर जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात १७ गुंठ्यांमध्ये ४२ प्रकारच्या विविध ४६०० रोपांची लागवड मियावाकी वृक्ष लागवड पद्धतीचा वापर करून औरंगाबादचे महसूल विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर आणि बीडचे जिल्हाधिकारी यांच्या प्रेरणेतून १ ऑगस्ट २०२० मध्ये अटल आनंदवन घन वन प्रकल्पात रोपांची लागवड केली असल्याची माहिती अंबाजोगाई येथील अपर जिल्हाधिकारी मंजूषा मिसकर यांनी पत्रकारांना दिली.

कार्यालयात सलग जागतिक चिमणी दिन व जागतिक वन दिनाचे औचित्य साधून जनजागृती व जास्तीत जास्त पर्यावरणासाठी आवश्यक कामे करण्याचे आवाहन यावेळी त्यांनी केले. जागतिक वन दिनानिमित्त अपर जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात बांबूच्या रोपांची लागवड करण्यात आली. बांबूच्या झाडांमुळे जमिनीची धूप कमी होऊन पर्यावरणाचा समतोल राखण्यास मदत होते. तसेच परिसरातील प्रत्येक शेतकरी बांधवाने आपल्या शेतातील बांधावर बांबूची लागवड करावी, असे आवाहन देखील केले.

जागतिक चिमणी व जल दिनानिमित्त कार्यालयाच्या ओसाड परिसरात पक्ष्यांसाठी निसर्ग फ्रेंडली पाणवठा तयार करण्यात आला. अपर जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात हे सर्व उपक्रम लोकसहभागातून व कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या श्रमदानातून व इतर शासकीय यंत्रणेच्या मदतीने राबविण्यात आले. कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी श्रमदान करून केवळ सहाच महिन्यांत मियावाकी वृक्ष लागवड करत कार्यालयाचा परिसर हिरवाईने नटवून टाकला. कालपर्यंत संपूर्ण खडकाळ असलेला परिसर अपर जिल्हाधिकारी यांच्यासोबत काम करणाऱ्या चमूने वृक्षारोपण करून हिरवाईने माखून टाकला.

पर्यावरणासाठी काम करणाऱ्या या सर्व चमूचे काम कौतुकास्पद असल्याने सर्व अंबाजोगाईकरांकडून या उपक्रमाचे स्वागत होत आहे.

===Photopath===

230321\avinash mudegaonkar_img-20210323-wa0035_14.jpg

===Caption===

अपर जिल्हाधिकारी कार्यालय अंबाजोगाई येथे जागतिक चिमणी व वन दीन साजरा करण्यात आला.

Web Title: Celebration of World Chimney and Forest Day at Additional Collector Office, Ambajogai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.