जिल्हा माहिती कार्यालयात ‘दर्पण दिन’ साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:48 IST2021-01-08T05:48:33+5:302021-01-08T05:48:33+5:30
महावितरण कार्यालयास गाजर गवताचा विळखा बीड : शहरातील माळीवेस भागातील महावितरणच्या उपविभागीय कार्यालयाच्या परिसरात गाजर गवत उगवले आहे. त्यामुळे ...

जिल्हा माहिती कार्यालयात ‘दर्पण दिन’ साजरा
महावितरण कार्यालयास गाजर गवताचा विळखा
बीड : शहरातील माळीवेस भागातील महावितरणच्या उपविभागीय कार्यालयाच्या परिसरात गाजर गवत उगवले आहे. त्यामुळे अधिकारी, कर्मचाऱ्यांसह कामासाठी येणाऱ्या ग्राहकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. परिसर स्वच्छ करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
कोंडवाडा सुरू करावा
बीड : मोकाट गुरांना कोंडण्यासाठी तयार केलेला कोंडवाडा मागील अनेक वर्षांपासून बंद आहे. बीड नगरपालिकेकडून तो सुरू करण्याबाबत उपाययोजना नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शहरात मोकाट गुरांचा वावर वाढला आहे. काही वेळा जनावरे नागरिकांच्या अंगावर धावून येत आहेत. कोंडवाडा सुरू करण्याची मागणी शहरवासीयांमधून जोर धरू लागली आहे.
अस्ताव्यस्त पार्किंग
बीड : शहरातील सुभाष रोड, नगर रोडवर रस्त्याच्या मधोमध वाहनधारक वाहने अस्ताव्यस्तपणे उभी करीत आहेत. त्यामुळे इतर वाहनांना ये-जा करताना मोठा अडथळा निर्माण होत आहे. वाहतूक शाखेने या वाहनांवर कारवाई करून रस्ता मोकळा करावा, अशी मागणी सामान्य वाहनधारकांमधून केली जात आहे, तसेच येथे कर्मचारी नियुक्त करण्याची मागणी आहे.