संविधान वाचन, भित्तीपत्रक विमोचन आदी उपक्रमांनी प्रजासत्ताकदिन साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:25 IST2021-02-05T08:25:51+5:302021-02-05T08:25:51+5:30
कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्राचार्य कॅप्टन डॉ. एम. जी. राजपंगे व प्रमुख पाहुणे डॉ. सी. एस. आवारे, शारीरिक शिक्षण ...

संविधान वाचन, भित्तीपत्रक विमोचन आदी उपक्रमांनी प्रजासत्ताकदिन साजरा
कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्राचार्य कॅप्टन डॉ. एम. जी. राजपंगे व प्रमुख पाहुणे डॉ. सी. एस. आवारे, शारीरिक शिक्षण विभागप्रमुख डॉ. एस. जी. कदम, कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य पी. एच. गुंजाळ, कार्यालयीन अधीक्षक टी. एस. घरत तसेच उन्नत भारत विभागाचे प्रमुख प्रा.डॉ. एस. एस. लांडगे उपस्थित होते. आभारप्रदर्शन डॉ. व्ही. एस. कंधारे यांनी केले.
इतिहास व राज्यशास्त्र विभागातर्फे स्वतंत्र भित्तीपत्रक विमोचन झाले. बी.ए. तृतीय वर्ष विद्यार्थ्यांनी इतिहास विभागप्रमुख डॉ. व्ही. एस. कंधारे, डॉ. आर. पी. पवार यांच्या मार्गदर्शनाखाली, तर राज्यशास्त्र विभागप्रमुख डॉ. के. जी. पोकळे व प्रोफेसर डॉ. एच. एस. भूमकर यांच्या मार्गदर्शनाखाली संकलन केले.
सदरील कार्यक्रमासाठी कनिष्ठ आणि वरिष्ठ विभागातील सर्व प्रोफेसर, सहयोगी/ सहायक, प्राध्यापक, कनिष्ठ प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.