अवैध वाळूचे दोन ट्रॅक्टर पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 04:26 IST2021-01-10T04:26:05+5:302021-01-10T04:26:05+5:30
बीड : जिल्ह्यात वाळूमाफियांनी उच्छाद मांडला असून जिल्ह्यात एकही शासकीय टेंडर नसताना सर्रासपणे नदीपात्रातील वाळूचा उपसा होत आहे. ...

अवैध वाळूचे दोन ट्रॅक्टर पकडले
बीड : जिल्ह्यात वाळूमाफियांनी उच्छाद मांडला असून जिल्ह्यात एकही शासकीय टेंडर नसताना सर्रासपणे नदीपात्रातील वाळूचा उपसा होत आहे. बीड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतून अवैध वाळू वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर स्थानिक गुन्हे शाखेने शुक्रवारी (दि.८) ताब्यात घेतले.
तांदळवाडी शिवारातील तुपेवस्ती जवळ अवैध वाळू वाहतूक करणारा एक ट्रॅक्टर पोलिसांनी पकडला. त्यामध्ये एक ब्रास वाळू होती. चालक प्रदीप भास्कर रकटे (रा. आहेर चिंचोली) याला ट्रॅक्टरसह पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याच्यावर ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल केला आहे तर दुसरी कारवाई पेंडगाव ते तांदळवाडी या रोडवर एक ट्रॅक्टर पकडला. त्यातही एक ब्रास वाळू होती. चालक भाऊसाहेब रामनाथ यमगर (रा. शहाजानपूर, ता. गेवराई) याला ट्रॅक्टरसह ताब्यात घेत त्याच्यावरही बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पीआय भारत राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय विजय गोसावी, हवालदार खेडकर, पोलीस नाईक कदम, गायकवाड, शिंदे, दुबाले, हरके यांनी केली.