अवैध वाळू वाहतूक करणारा ट्रक पकडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:28 IST2021-02-05T08:28:36+5:302021-02-05T08:28:36+5:30
बीड : आष्टी तालुक्यात स्थानिक गुन्हे शाखेचे पथक गस्तीवर होते. यावेळी अवैधरित्या वाळू वाहतूक करताना एक ट्रक (क्र. एमएच ...

अवैध वाळू वाहतूक करणारा ट्रक पकडला
बीड : आष्टी तालुक्यात स्थानिक गुन्हे शाखेचे पथक गस्तीवर होते. यावेळी अवैधरित्या वाळू वाहतूक करताना एक ट्रक (क्र. एमएच १२ सीएच १७११) ताब्यात घेतला असून, संबंधितावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई २३ जानेवारी रोजी पाहटेच्या दरम्यान करण्यात आली.
गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक आर. राजा यांच्या आदेशाने स्थानिक गुन्हे शाखेचे पथक आष्टी तालुक्यात गस्तीवर होते. यावेळी सिना नदीपात्रातून वाळू वाहतूक करताना एक ट्रक पथकाच्या निदर्शनास आला. त्याचा पाठलाग करून ट्रकचालकास थांबवण्यात आले. यावेळी त्याच्याकडे मुद्देमालाचा परवाना विचारला असता तो मिळून आला नाही. त्यामुळे आष्टी पोलीस ठाण्यात याप्रकरणी ट्रकचालक अमोल रामदास आडसूळ (रा. तिखी. ता. कर्जत, जि. अ. नगर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि विजय गोसावी, पोना कदम, दुबाले, शिंदे, चालक गर्जे यांनी केली.