वाळूची अवैध वाहतूक करणारा हायवा पकडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:22 IST2021-06-24T04:22:50+5:302021-06-24T04:22:50+5:30
गेवराई : तालुक्यातील गोपत-पिंपळगाव येथील गोदापात्रातून अवैधरित्या वाळू वाहतूक करणारा हायवा तलवाडा पोलिसांनी पकडला. या कारवाईत हायवासह ...

वाळूची अवैध वाहतूक करणारा हायवा पकडला
गेवराई : तालुक्यातील गोपत-पिंपळगाव येथील गोदापात्रातून अवैधरित्या वाळू वाहतूक करणारा हायवा तलवाडा पोलिसांनी पकडला. या कारवाईत हायवासह ५ ब्रास वाळू असा एकूण १५ लाख ५० हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला.
गेवराई तालुक्यातून हायवामधून वाळू वाहतूक करण्यास जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार बंदी आहे. हे आदेश धुडकावून गोदावरी नदीतून वाळू माफियांकडून अवैधरित्या वाळू उपसा सुरूच आहेत. तालुक्यातून गेलेल्या गोदावरी पत्रातून हे वाळूमाफिया रात्री अवैध वाळू उपसा करीत आहेत. मंगळवारी रात्री गोपत पिंपळगाव येथून अवैधरित्या वाळू वाहतूक करणारा हायवा तलवाडा पोलीस ठाण्याचे सपोनि प्रताप नवघरे यांना आढळून आला. या हायवाला अडवून यामधील ५ ब्रास वाळूसह हायवा असा मिळून १५ लाख ५० हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला. कारवाईनंतर हायवा तलवाडा ठाण्यात लावण्यात आला असून, चालक व मालकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि प्रताप नवघरे, पो. ना. कृष्णा वडकर, पोलीस शिपाई राम खंडागळे, अंकुश राहटवाड, भरत गायकवाड,बाळू जाधव आदींनी केली.
===Photopath===
220621\3244img-20210622-wa0358_14.jpg