खांबास बांधून विषारी औषध पाजले, १३ जणांविरोधात गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:49 IST2021-01-08T05:49:46+5:302021-01-08T05:49:46+5:30
केज तालुक्यातील युसूफवडगाव येथील शेतकरी विलास मारुती पानढवळे हे २४ डिसेंबर रोजी सकाळी साडेदहा वाजता सर्वे नं ७१ मध्ये ...

खांबास बांधून विषारी औषध पाजले, १३ जणांविरोधात गुन्हा दाखल
केज तालुक्यातील युसूफवडगाव येथील शेतकरी विलास मारुती पानढवळे हे २४ डिसेंबर रोजी सकाळी साडेदहा वाजता सर्वे नं ७१ मध्ये त्यांच्या शेतात पाईप एकत्र जमा करण्याचे काम करीत होते. यातील आरोपीने लोक एकत्र जमवून फिर्यादीस लाकडीकाठीने, चप्पलबुटाने, दगडाने मारहाण केली. फिर्यादीचे दोन्ही पाय धरून रस्त्याने ओढत नेऊन विद्युत खांबाला दोरीने बांधून डोळ्यावर पट्टी बांधून जिवे मारण्याच्या उद्देशाने विषारी औषध पाजले. विलास मारूती पानढवळे यांच्या फिर्यादीवरून ५ जानेवारी रोजी युसूफवडगाव पोलीस ठाण्यात आरोपी बालासाहेब मारुती पानढवळे, वैभव पानढवळे, विकास पानढवळे, बालासाहेब दत्तुबा, निवृत्ती शिंपले, बाबा दत्तु शिंपले, आश्रुबा दत्तुबा शिंपले, महादेव धोंडिबा शिंपले, अनुसया बालासाहेब पानढवळे, गीता वैभव पानढवळे, स्वाती विकास पानढवळे, सोन्याच्या पत्नी अशा तेरा जणांविरोधात गुन्हा दाखल झाला. पुढील तपास युसूफवडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक कोळी हे करीत आहेत.