परळीत शिवसेना तालुका प्रमुखाची कार जाळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2018 00:40 IST2018-01-05T00:40:05+5:302018-01-05T00:40:27+5:30

परळी येथील शिवसेना तालुकाप्रमुख वैजनाथ सोळंके यांची कार बुधवारी रात्री ११ वाजेच्या सुमाास अज्ञात लोकांनी जाळल्याचा प्रकार घडला.

The car of Shivsena Taluka head was burnt in Parli | परळीत शिवसेना तालुका प्रमुखाची कार जाळली

परळीत शिवसेना तालुका प्रमुखाची कार जाळली

ठळक मुद्देअधिका-यांची घटनास्थळाला भेट

लोकमत न्यूज नेटवर्क
परळी : येथील शिवसेना तालुकाप्रमुख वैजनाथ सोळंके यांची कार बुधवारी रात्री ११ वाजेच्या सुमाास अज्ञात लोकांनी जाळल्याचा प्रकार घडला. अंबाजोगाईचे उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल आनंद यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली.

त्यानंतर शिवसैनिकांनी पोलीस अधिका-यांची भेट घेऊन तपास करून तात्काळ आरोपींना अटक करण्याची मागणी केली. शहर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय काळे हे करीत आहेत.

दरम्यान, या घटनेबद्दल वेगवेगळे तर्कवितर्क लावले जात आहेत. पोलिसांकडून याचा तपास केला जात आहे.

Web Title: The car of Shivsena Taluka head was burnt in Parli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.