कारची दुचाकीला धडक; एक जागीच ठार, दोन गंभीर जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:49 IST2021-01-08T05:49:59+5:302021-01-08T05:49:59+5:30
कडा (जि. बीड) नगरवरून बीडला जात असलेल्या अल्टो कारचालकाचा ताबा सुटल्याने समोरून येणाऱ्या दुचाकीस्वाराला धडक दिली. यात दुचाकीस्वाराचा जागीच ...

कारची दुचाकीला धडक; एक जागीच ठार, दोन गंभीर जखमी
कडा (जि. बीड) नगरवरून बीडला जात असलेल्या अल्टो कारचालकाचा ताबा सुटल्याने समोरून येणाऱ्या दुचाकीस्वाराला धडक दिली. यात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला तर सून आणि नातू गंभीर जखमी झाल्याची घटना ६ जानेवारी रोजी बीड - धामणगाव - नगर रोडवरील सांगवी पाटण येथे साडेअकराच्या सुमारास घडली.
अल्टो कार चालक एमएच ०६ एएफ २१९८ घेऊन नगरवरून बीडला जात असताना बुधवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास कापशीवरून धामणगाव येथे लग्न समारंभासाठी जात असलेल्या दुचाकीला समोरासमोर जोराची धडक दिली. यात दुचाकीस्वार एकनाथ गोल्हार (६२, रा. कापशी) यांचा जागीच मृत्यू झाला तर दुचाकीवर असलेली सून बबई बाजीराव गोल्हार (५५ ) आणि नातू रामकृष्ण अंबादास गोल्हार (१९) हे गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर अहमदनगर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कारचालक अपघात घडताच पळून गेला. याप्रकरणी अंभोरा पोलीस ठाण्यात कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.