कारने पादचाऱ्याला उडविले, एक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2021 04:30 IST2021-03-14T04:30:03+5:302021-03-14T04:30:03+5:30

धारूर : भरधाव कारने पायी जाणाऱ्या मजुराला धडक दिल्याने तो जागीच ठार झाल्याची घटना शेगाव- पंढरपूर राष्ट्रीय ...

The car blew up a pedestrian, killing one | कारने पादचाऱ्याला उडविले, एक ठार

कारने पादचाऱ्याला उडविले, एक ठार

धारूर : भरधाव कारने पायी जाणाऱ्या मजुराला धडक दिल्याने तो जागीच ठार झाल्याची घटना शेगाव- पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावरील धारूर ते तेलगाव रस्त्यावर शुक्रवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास घडली. या रस्त्यावर अपघाताची मालिका सुरूच असून उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.

सुरेश माणिक माळेकर (वय २९, रा. गोपाळपूर) हा हाॕॅटेलमधील मजुरीचे काम संपवून घरी जात होता. या रस्त्याने धारूरहून तेलगावकडे जाणाऱ्या कारने (क्र. एम एच २३, ए. डी. ०१४३) जोराची धडक दिल्याने तो जागीच ठार झाला. अपघाताची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक सुरेखा धस या कर्मचाऱ्यांसह तात्काळ घटनास्थळी भेट दिली. याप्रकरणी धारूर पोलीस ठाण्यात संबंधित कारचालकाविरूध्द गुन्हा नोंदविण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस करीत आहेत. शुक्रवारी दिवसभरातील हा दुसरा अपघात होता.

===Photopath===

130321\img_20210313_092604_14.jpg~130321\anil mhajan_img-20210313-wa0062_14.jpg

===Caption===

धारूर- तेलगाव रस्त्यावर कारने धडक दिल्याने पादचारी मजूर सुरेश माळेकर जागीच ठार झाला.

Web Title: The car blew up a pedestrian, killing one