बेडवरून उठताही येत नाही; घाबरू नका, लवकरच घरी येऊन दिली जाणार लस !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:30 IST2021-07-26T04:30:08+5:302021-07-26T04:30:08+5:30

आरोग्य विभागाचे नियोजन : आशाताई, अंगणवाडी सेविकांकडून माहिती घेणे सुरू बीड : जे लोक अंथरुणाला खिळून आहेत, बेडवरून उठता ...

Can't even get out of bed; Don't worry, the vaccine will come home soon! | बेडवरून उठताही येत नाही; घाबरू नका, लवकरच घरी येऊन दिली जाणार लस !

बेडवरून उठताही येत नाही; घाबरू नका, लवकरच घरी येऊन दिली जाणार लस !

आरोग्य विभागाचे नियोजन : आशाताई, अंगणवाडी सेविकांकडून माहिती घेणे सुरू

बीड : जे लोक अंथरुणाला खिळून आहेत, बेडवरून उठता येत नाही, अशा लोकांनी कोरोना लस घेण्यासाठी केंद्रावर येण्याची गरज आहे. आरोग्य विभागाकडून घरी जाऊन लस देण्याचे नियोजन केले जात आहे. यासाठी आशाताई, अंगणवाडी सेविकांमार्फत माहिती घेणेही सुरू झाले आहे. यामुळे बेडवर असणाऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

जिल्ह्याला अद्यापही अपेक्षेप्रमाणे कोरोना लसीचे डोस मिळालेले नाही. आठवड्याला केवळ २० ते २५ हजार डोस पुरविले जात आहेत. हा आकडा लाभार्थ्यांच्या तुलनेत खूपच अपुरा आहे. त्यामुळे केंद्रावर आलेल्या लोकांना लस न घेताच रिकाम्या हाताने परतावे लागत आहे. त्यामुळे लसीकरणाची गती संथ असून, आतापर्यंत केवळ ६ लाख ६० हजार लोकांना डोस टोचण्यात आली आहे. असे असतानाच आता शासनाने हायरिस्क लोकांना घरी जावून लस देण्याचे निर्देश दिले आहेत. त्याप्रमाणे बीड आरोग्य विभागाकडून नियोजन करण्यात आले असून, सर्वेक्षण करून अंथरुणाला खिळलेल्या व बेडवर असलेल्या लोकांची माहिती घेणे सुरू आहे. येत्या आठवडाभरात सर्वेक्षण पूर्ण होणार असून, लवकरच शासनाच्या आदेशानुसार लस दिली जाणार असल्याचे सांगण्यात आले.

पुणे, मुंबईत सुरुवात, बीडमध्येही लवकरच

शासनाच्या आदेशाप्रमाणे पुणे व मुंबई या ठिकाणी अशाप्रकारे लसीकरणाला सुरुवातही झाली आहे; परंतु बीडमध्ये अद्याप याला सुरुवात झालेली नसली तरी सर्वेक्षण पूर्ण होताच घरोघरी जाऊन लस दिली जाणार आहे. ही लस केवळ जे बेडवर आहेत, ज्यांना घराबाहेर पडणे अशक्यच आहे, अशांनाच दिली जाणार असल्याचे सांगण्यात आले. यासाठी स्वतंत्र यंत्रणा तयार केली जाणार आहे.

--

शासनाच्या निर्देशाप्रमाणे अंथरुणाला खिळून असलेल्यांना घरी जावून लस दिली जाणार आहे. त्यासाठी आशाताई, अंगणवाडी सेविकांमार्फत सर्वेक्षण सुरू असून, येत्या दोन चार दिवसांत ते पूर्ण होईल. त्यानंतर लसीकरणाला सुरुवात केली जाईल. यासाठी स्वतंत्र यंत्रणेचे नियोजन केले जाईल.

डॉ.रौफ शेख, नोडल ऑफिसर बीड

---

आतापर्यंत झालेले लसीकरण

पहिला डोस ५,११,४०६

दुसरा डोस १,४९,४६३

एकूण लसीकरण ६,६०,८६९

----

६० वर्षांवरील लसीकरण

पहिला डोस १,८४,५२६

दुसरा डोस ५७,५३२

240721\235824_2_bed_15_24072021_14.jpeg

डाॅ.रौफ शेख

Web Title: Can't even get out of bed; Don't worry, the vaccine will come home soon!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.