शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

शक्तिप्रदर्शन करीत भरले उमेदवारी अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2019 00:11 IST

विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील सहा मतदार संघात गुरुवारी मोठ्या संख्येने उमेदवारी अर्ज दाखल झाले. प्रमुख राजकीय पक्षासह अपक्षांचीही भाऊगर्दी झाली. उमेदवारी अर्ज भरण्याचा शुक्रवारी शेवटचा दिवस आहे. बीड मतदार संघातून शिवसेनेच्या वतीने जयदत्त क्षीरसागर यांच्यासह सहा उमेदवारांनी अर्ज भरले.

ठळक मुद्देआज शेवटचा दिवस : अर्ज भरल्यानंतर प्रमुख पक्षातील उमेदवारांच्या भरल्या सभा

बीड : विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील सहा मतदार संघात गुरुवारी मोठ्या संख्येने उमेदवारी अर्ज दाखल झाले. प्रमुख राजकीय पक्षासह अपक्षांचीही भाऊगर्दी झाली. उमेदवारी अर्ज भरण्याचा शुक्रवारी शेवटचा दिवस आहे.बीड मतदार संघातून शिवसेनेच्या वतीने जयदत्त क्षीरसागर यांच्यासह सहा उमेदवारांनी अर्ज भरले.परळीतून भाजपच्या पंकजा मुंडे, राष्टÑवादी कॉँग्रेसचे धनंजय मुंडे यांच्यासह १५ उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले. शिवाजी चौकातून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून पंकजा मुंडे यांच्या रॅलीला वाजत गाजत सुरवात झाली. लक्ष्मीबाई टॉवर चौकात जाहीर सभा झाली. उमेदवारी दाखल केल्यानंतर गोपीनाथ गडावर जाऊन लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या समाधीचे दर्शन घेतले. तर धनंजय मुंडे यांनी सकाळी उमेदवारी अर्ज दाखल केला. दुपारी परळी शहरातून रॅली काढल्यानंतर प्रचार सभा झाली.आष्टी मतदार संघातून रामदास सूर्यभान खाडे, अमोल रामदास तरटे, रवींद्र नवनाथ ढोबळे, भिमराव आनंदराव धोंडे, साहेबराव नाथुजी दरेकर, जयदत्त सुरेश धस यांनी उमेदवारी दाखल केली.केज मतदारसंघात गुरुवारी भाजपच्या नमिता मुंदडा, राष्ट्रवादी काँग्रेसचे पृथ्वीराज साठे, जयश्री साठे, विलास काळूंके, अ‍ॅड. राहुल मस्के, जयश्री साठे यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केले.गेवराईतून राष्टÑवादी कॉँग्रेसचे विजयसिंह पंडित, अमरसिंह पंडित, अपक्ष बदामराव पंडित यांच्यासह २२ जणांनी उमेदवारी दाखल केली.माजलगाव मतदार संघातून राष्टÑवादी कॉँग्रेसचे प्रकाश सोळंके यांच्यासह १२ उमेदवारांनी अर्ज दाखल केले.

टॅग्स :BeedबीडMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Pankaja Mundeपंकजा मुंडेDhananjay Mundeधनंजय मुंडे