केजचे मंगळवार पेठ बनले कचरा डेपो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:22 IST2021-06-27T04:22:15+5:302021-06-27T04:22:15+5:30

शहरातील विविध भागात ओला व सुका कचरा टाकण्यासाठी नगरपंचायतीने कचरा कुंडीची सुविधा केलेली नसल्याने शहरातील गृहिणींना घरातील ओला व ...

Cage's Peth became a waste depot on Tuesday | केजचे मंगळवार पेठ बनले कचरा डेपो

केजचे मंगळवार पेठ बनले कचरा डेपो

शहरातील विविध भागात ओला व सुका कचरा टाकण्यासाठी नगरपंचायतीने कचरा कुंडीची सुविधा केलेली नसल्याने शहरातील गृहिणींना घरातील ओला व सुका कचरा कोठे टाकावा याचा प्रश्न पडत आहे. अशीच परिस्थिती शहरातील व्यावसायिकांची आहे. मंगळवार पेठेत काही स्वीट होम व काही खासगी दवाखाने आहेत. कचरा कुंडी नसल्याने परिसरातील लोक ओला व सुका कचरा रात्रीच्या अंधारात मंगळवार पेठेतील रस्त्यावर टाकून देतात.

शहरातील प्रमुख बाजारपेठ असलेल्या मंगळवार पेठेतील रस्त्यासह शहरातील इतर ठिकाणच्या भागातील रस्ते व गल्ली बोळात नागरिकांना कचरा टाकण्यास नगर पंचायतीने मज्जाव करावा व मंगळवार पेठेत कचरा टाकण्यासाठी कचराकुंडी बसवाव्यात, अशी मागणी नागरिकांतून केली जात आहे. शहरातील व गल्लीतील रस्त्यावर टाकलेला कचरा उचलण्याबाबत नगरपंचायतकडे मागणी करूनही नोंद घेतली जात नसल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

===Photopath===

260621\img_20210626_085124.jpg

===Caption===

केज शहरातील मंगळवार पेठेतील रस्त्यावर रात्रीच्या वेळी टाकलेला कचरा.

Web Title: Cage's Peth became a waste depot on Tuesday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.