केज तालुक्याला दुसऱ्या लाटेचा जोरदार फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:23 IST2021-06-17T04:23:40+5:302021-06-17T04:23:40+5:30

दीपक नाईकवाडे लोकमत न्यूज नेटवर्क केज : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत तालुक्यातील ८ हजार ६०१ नागरिकांना कोरोनाची लागण ...

Cage taluka hit hard by the second wave | केज तालुक्याला दुसऱ्या लाटेचा जोरदार फटका

केज तालुक्याला दुसऱ्या लाटेचा जोरदार फटका

दीपक नाईकवाडे

लोकमत न्यूज नेटवर्क

केज : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत तालुक्यातील ८ हजार ६०१ नागरिकांना कोरोनाची लागण झाली होती. १५ जूनपर्यंत ८ हजार १४५ कोरोनाचे रुग्ण बरे झाल्याने तालुक्याचा रिकव्हरी रेट ९५ टक्के आला आहे. आतापर्यंत तालुक्यातील २३२ नागरिकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या २२४ रूग्णांवर उपचार चालू असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विकास आठवले यांनी लोकमतला दिली.

कोरोनाच्या दुसऱ्या टप्प्यात तालुक्यातील ८ हजार ६०१ नागरिकांना कोरोनाची लागण झाल्याचे निदान करण्यात आले. यामध्ये केज शहरातील १ हजार ६०७ कोरोना रूग्ण तर ग्रामीण भागातील ६ हजार ९९४ कोरोना रुग्णांचा समावेश होता. या रुग्णांवर कोविड केअर सेंटरमध्ये उपचार करण्यात आले. तर काहींवर लोखंडी सावरगाव येथील जम्बो कोविड सेंटरमध्ये उपचार करण्यात आले.

बुधवारपर्यंत तालुक्यातील २२४ कोरोना रुग्णांवर कोविड केअर सेंटरमध्ये उपचार सुरू होते. यामध्ये केज शहरातील १६ तर ग्रामीण भागातील २०८ रुग्णांचा समावेश आहे. केज तालुक्यातील शिरूर येथील लताई कोविड केअर मध्ये तीन ,पिसेगाव येथील ८०, बनसारोळा येथील कोविड केअर सेंटरमध्ये २१ तर उपजिल्हा रुग्णालयातील कोविड केअरमध्ये ७, निरामयीमध्ये ९ व योगिता बाल रुग्णालयातील कोविड केअर सेंटरमध्ये ११ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

महसूल, पोलीस विभागाने अंग झटकले

दरम्यान कोरोनाचे रुग्ण कमी झाल्याने लॉकडाऊनचे नियम शिथिल करण्यात आले. दुपारी चार वाजेपर्यंत सवलत देण्यात आली. त्यानंतर महसूल विभाग व पोलीस प्रशासनाने अंग झटकल्याने केज शहरात नागरिकांचा मुक्त संचार वाढला आहे. संचारबंदीच्या वेळेतही व्यवसाय बिनदिक्कत सुरू असल्याने याचा परिणाम कोरोना रुग्ण वाढीस होण्याची शक्यता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी वर्तवली आहे.

ग्रामीण भागात मृत्यू जास्त

कोरोनाच्या दुसऱ्या टप्प्यात केज तालुक्यातील २३२ नागरिकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. यामध्ये केज शहरातील ४४ नागरिकांचा तर ग्रामीण भागातील १८८ नागरिकांचा समावेश आहे. तालुक्यातील कोरोनाची रुग्णसंख्या कमी झाल्याने केज व कुंबेफळ येथील कोविड केअर सेंटर बंद केल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली.

तीन कोविड केअर सेंटर चालू होण्याआधीच बंद

तालुक्यातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता तालुक्यात तीन कोविड केअर सेंटरला मान्यता देण्यात आली होती. मात्र कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्याने युवाग्राम ,युसुफवडगाव व रेणुका नर्सिंग होम विडा हे तीन कोविड केअर सेंटर बंद करण्यात आल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. आठवले यांनी दिली.

Web Title: Cage taluka hit hard by the second wave

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.