केज पंचायत समितीच्या सभापतींसह तीन सदस्यांचा राजीनामा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 04:21 IST2021-07-12T04:21:56+5:302021-07-12T04:21:56+5:30
तालुक्यातील टाकळी गणातून निवडून आलेल्या परिमळा विष्णू घुले यांची केज पंचायत समितीच्या सभापतिपदी माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी वर्णी ...

केज पंचायत समितीच्या सभापतींसह तीन सदस्यांचा राजीनामा
तालुक्यातील टाकळी गणातून निवडून आलेल्या परिमळा विष्णू घुले यांची केज पंचायत समितीच्या सभापतिपदी माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी वर्णी लावली होती. खा. डॉ. प्रीतम मुंडे यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने व पंकजा मुंडे यांचे खच्चीकरण होत असल्याची भावना झाल्याने सभापती परिमळा घुले यांनी जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्याकडे पदाचा राजीनामा सुपूर्द केला आहे. त्यांच्यासह पंचायत समिती सदस्य अनिता भगवान केदार, तानाजी जोगदंड, सुलाबाई सरवदे यांनीही आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे तर कालच तालुकाध्यक्ष भगवान केदार यांनीही राजीनामा दिल्याने पक्षाबद्दल उघड नाराजी व्यक्त होत आहे.
आष्टी तालुक्यात मुंडे समर्थकांचे राजीनामा सत्र
आष्टी : मोदी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराचे पडसाद आष्टी तालुक्यातही उमटले. भाजपच्या माजी जि. प. अध्यक्षा सविता गोल्हार यांनी सर्व पदांचे राजीनामे जिल्हाध्यक्ष म्हस्के यांच्याकडे सुपूर्द केले आहेत तर सरपंच राहुल काकडे, सरपंच एम. डी. लटपटे, पं. स. सदस्य लक्ष्मीबाई रावसाहेब लोखंडे, सरपंच राम गर्जे, ग्रा. पं. सदस्य आण्णा बांगर, कऱ्हेवाडीचे उपसरपंच बाळासाहेब सांगळे, सदस्य आर. डी. सांगळे यांनीही आपल्या पदाचे राजीनामे पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडे सुपूर्द केले आहेत.
110721\1757-img-20210711-wa0017.jpg~110721\img_20210711_175921.jpg
केज पंचायत समिती सभापती परिमळा विष्णू घुले~केज पंचायत समिती सभापती परिमळा विष्णू घुले यांनी राजीनामा देत असल्याचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांना दिलेले पत्र