बसच्या धडकेत शेतकऱ्यासह बैल ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:36 IST2021-03-09T04:36:12+5:302021-03-09T04:36:12+5:30
संदिपान लक्ष्मण केकान (रा. केकानवाडी, ता. केज, हल्ली मुक्काम तपोवन, ता. परळ) असे त्या मृत शेतकऱ्याचे नाव आहे. मागील ...

बसच्या धडकेत शेतकऱ्यासह बैल ठार
संदिपान लक्ष्मण केकान (रा. केकानवाडी, ता. केज, हल्ली मुक्काम तपोवन, ता. परळ) असे त्या मृत शेतकऱ्याचे नाव आहे. मागील एक वर्षापासून तपोवन येथील एका शेतकऱ्याची जमीन ते बटईने करत आहेत. शनिवारी सायंकाळी सात वाजता ते शेतातील दिवसभराचे काम आटोपून बैलगाडीतून घराकडे निघाले होते. वाटेत फाट्यानजीक बीडधून येणाऱ्या त्र्यंबकेश्वर-परळी बसने (एमएच १४ बीटी ४४४९) त्यांच्या बैलगाडीला पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात बैलगाडी जागेवर मोडून संदीपान केकान गंभीर जखमी झाले आणि एक बैल जागीच ठार, तर दुसरा जखमी झाला. अत्यवस्थ अवस्थेत संदीपान यांना अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे उपचारादरम्यान नऊ वाजताच्या सुमारास संदीपान केकान यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी लक्ष्मण केकान यांच्या फिर्यादीवरून बसचालकावर सिरसाळा पोलिसांत गुन्हा नोंदविण्यात आला.