चांदापूर येथे सोमवारी बौद्ध धम्म परिषद - A

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 05:03 IST2021-02-06T05:03:13+5:302021-02-06T05:03:13+5:30

शंकरराव जगतकर नगरी, चांदापूर (परळी वै.) येथे ही धम्म परिषद आयोजित करण्यात आली असून या धम्म परिषदेला उपस्थित राहून ...

Buddhist Dhamma Council on Monday at Chandapur - A | चांदापूर येथे सोमवारी बौद्ध धम्म परिषद - A

चांदापूर येथे सोमवारी बौद्ध धम्म परिषद - A

शंकरराव जगतकर नगरी, चांदापूर (परळी वै.) येथे ही धम्म परिषद आयोजित करण्यात आली असून या धम्म परिषदेला उपस्थित राहून सहभाग नोंदवावा, असे आवाहन स्वागताध्यक्ष डॉ. अरविंद गायकवाड (औरंगाबाद) व धम्म परिषदेचे संयोजक चंद्रकांत साधू इंगळे व राजेंद्र घोडके यांनी केले आहे.

धम्म परिषदेच्या अध्यक्षस्थानी अ‍ॅड. अनंतराव जगतकर हे असतील. यावेळी आ. संजय दौंड, जिल्हा परिषद अध्यक्षा शिवकन्या सिरसाट आणि माजी आ. पृथ्वीराज साठे यांची प्रमुख उपस्थिती असेल. तसेच यावेळी सुरेश शेजूळ (परळी), अधीक्षक डॉ.भारत सोनवणे (औरंगाबाद), पी. एस. नागरगोजे (अंबाजोगाई), संजय केंद्रे (परळी), आशा दौंड, डॉ. मधुकर आघाव, चंद्रशेखर वडमारे, डॉ. विनोद जगतकर, श्रीहरी गित्ते यांची उपस्थिती राहणार आहे. धम्म परिषदेस सर्वांनी पांढरे वस्त्र परिधान करूनच कार्यक्रमास उपस्थित रहावे, असे आवाहन चंद्रकांत इंगळे, प्रा.प्रदीप रोडे, राजेंद्र घोडके, राहुल घोडके, प्रा.गौतम गायकवाड, सचिन वाघमारे आदींनी

केले आहे.

Web Title: Buddhist Dhamma Council on Monday at Chandapur - A

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.