शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा "शिवसेना + राष्ट्रवादी + भाजपा सरकार" बनवण्याची ऑफर उद्धव ठाकरेंनी दिली होती; तटकरेंचा गौप्यस्फोट
2
पैशांची कमतरता, पक्षही देईना, निवडणूक लढू शकणार नाही; काँग्रेसच्या महिला उमेदवारानं परत केलं तिकीट
3
नितीन पाटलांना जूनमध्ये खासदार केलं नाही तर पवारांची औलाद सांगणार नाही; अजित पवारांची घोषणा
4
Priyanka Gandhi : "माझ्या भावाला राजपुत्र म्हणतात...; नरेंद्र मोदी हे सम्राट, महालात राहतात", प्रियंका गांधी कडाडल्या
5
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
6
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
7
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
8
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
9
फोटोतील या अभिनेत्याला ओळखलंत का?, त्याची अवस्था पाहून चाहते झाले हैराण
10
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
11
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
12
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
13
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
14
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
15
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
16
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
17
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
18
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली
19
शुबमनने हरलीनला दिले क्रिकेटचे धडे; महिला क्रिकेटपटूसाठी गिल बनला कोच, Video
20
दुबईहून कपड्यात लपवून आणलं २५ किलो सोनं; अफगाणिस्तानच्या बड्या अधिकाऱ्याला पकडलं

दगडाने ठेचून भावाचा केला खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 09, 2019 12:12 AM

मद्यधुंद दोन भावामध्ये कोणत्यातरी कारणावरून वाद झाला. या वादाचे रूपांतर हाणामारीत होऊन लहान भावाने मोठ्या भावाची घरासमोरच दगडाने ठेचून हत्या केली. ही घटना अंबाजोगाई तालुक्यातील पाटोदा (ममदापूर) येथे रविवारी सायंकाळी घडली.

ठळक मुद्देदोघेही होते मद्यधुंद : पाटोदा ममदापूर येथील घटना

अंबाजोगाई : मद्यधुंद दोन भावामध्ये कोणत्यातरी कारणावरून वाद झाला. या वादाचे रूपांतर हाणामारीत होऊन लहान भावाने मोठ्या भावाची घरासमोरच दगडाने ठेचून हत्या केली. ही घटना अंबाजोगाई तालुक्यातील पाटोदा (ममदापूर) येथे रविवारी सायंकाळी घडली.विलास मोहन यशवंत (वय ५०, रा. पाटोदा म.) असे मयताचे नाव आहे. विलास आणि त्यांचा लहान भाऊ बंडू या दोघांनीही रविवारी सायंकाळी मद्य प्राशन केले होते. त्यानंतर सायंकाळी ६ च्या सुमारास दोघांमध्ये त्यांच्या राहत्या घरासमोर कुठल्या तरी कारणावरून वाद झाला. अल्पावधीतच या वादाचे पर्यावसान हाणामारीत झाले. या भांडणात झटापटीनंतर अचानकपणे बंडूने दगडाने मारहाण करायला सुरुवात केली. ही मारहाण एवढी मोठी होती की विलासचा मृत्यू झाला. या घटनेमुळे गावात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक राहुल धस, ग्रामीणचे पोलीस निरिक्षक महादेव राऊत, सपोनि सावंत, पीएसआय मनीषा लटपटे, पो.ह. माऊली बडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. आरोपी बंडू मोहन यशवंत याला तात्काळ ताब्यात घेण्यात आले असून, त्याच्यावर ग्रामीण ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती.

टॅग्स :BeedबीडMurderखूनCrime Newsगुन्हेगारी