शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
3
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
4
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
5
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
6
ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
7
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
8
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
9
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
10
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
11
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
12
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
13
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
14
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
15
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
16
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
17
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
18
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
19
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
20
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद

Breaking : धनंजय मुंडेंसह राष्ट्रवादीच्या 5 उमेदवारांची घोषणा, शरद पवारांकडून पहिली यादी जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2019 14:09 IST

बीडमधील कार्यक्रमात बोलताना पवार यांनी मोदी सरकार आणि फडणवीस यांच्यावर टीकास्त्र सोडले.

बीड - राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आज बीड जिल्ह्यातील पदाधिकारी अन् कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. या मेळाव्यात पवारांनी बीडमधील काही उमेदवारांची घोषणा केली. त्यावेळी, उपस्थित कार्यकर्त्यांनीही या नावांची घोषणा होताच जल्लोष केला. शरद पवार यांनी बीड जिल्ह्यातील पाच संभाव्य उमेदवारांची घोषणा केली. आपल्या महाराष्ट्र दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशीच राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधानसभा उमेदवारांची पहिली यादी पवार यांनी जाहीर केली. 

बीडमधील कार्यक्रमात बोलताना पवार यांनी मोदी सरकार आणि फडणवीस यांच्यावर टीकास्त्र सोडले. त्यानंतर, आगामी विधानसभा निवडणुकांसाठी तयार राहण्याचे आदेश कार्यकर्त्यांना दिले आहेत. तसेच, मी तरुणांच्या जोरावर मी ही निवडणूक लढवत आहे, असे म्हणत पवार यांनी राष्ट्रवादीच्या 5 उमेदवारांची घोषणा केली. विशेष म्हणजे पवार यांनी तरुण उमेदवारांना संधी दिल्याचे दिसून येत आहे. पवार यांनी व्यासपीठावरच उमेदवारांची घोषणा केली, त्यावेळी उमेदवारांनी पवार यांचे आशीर्वाद घेतले.

पवार यांनी, परळी विधानसभा मतदारसंघात धनंजय मुंडे यांना उमेदवारी दिल्याचे घोषित केले. तर गेवराई मतदारसंघातून विजयसिंह पंडित, केजमधून विमलताई मुंदडा यांच्या कार्याला पुढे नेणारे नेतृत्व म्हणून नमिता मुंदडा यांच्या नावाची घोषणा केली. तसेच, बीडमधून संदीप क्षीरसागर आणि माजलगावमधून प्रकाश सोळंके असे पहिले पाच उमेदवार शरद पवार यांनी जाहीर केले. तर, जिल्ह्यातील एकमेव बाकी राहिलेल्या आष्टी या मतदारसंघातील उमेदवार लवकरच जाहीर करु, असेही पवारांनी सांगितलं.

2014 मध्ये निवडून आलेले या 5 जागांवरील विद्यमान आमदार

गेवराई – लक्ष्मण पवार (भाजप)माजलगाव – आर.टी. देशमुख (भाजप )बीड – जयदत्त क्षीरसागर (राष्ट्रवादी – सध्या शिवसेना)केज – संगिता ठोंबरे (भाजप)परळी – पंकजा मुंडे (भाजप)

 

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसDhananjay Mundeधनंजय मुंडेBeedबीडPoliticsराजकारणvidhan sabhaविधानसभाAssembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019