शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचे किती विमान पाडले? हा प्रश्न विरोधकांच्या मनात कधी आला नाही; राजनाथ सिंह कडाडले
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान नेमकं काय घडलं, किती दहशतवादी मारले गेले? राजनाथ सिंह यांनी लोकसभेत दिली माहिती, म्हणाले...
3
Operation Mahadev: सैन्याला मोठे यश! पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी मुसा मारला गेल्याची शक्यता, तीन दहशतवादी ठार
4
IND vs ENG: टीम इंडियाला मोठा धक्का! ऋषभ पंत पाचव्या कसोटीतून बाहेर, CSKच्या खेळाडूला संघात स्थान
5
सातव्या वेतन आयोगांतर्गत पगारात लवकरच होणार अखेरची वाढ; कसा होणार १ कोटी कर्मचाऱ्यांना फायदा?
6
९० दीच्या लाटेवर स्वार व्हायला आली! कायनेटीकची DX ईव्ही लाँच झाली, पहा किंमत आणि रेंज...
7
Nitin Shete: शनि शिंगणापूर संस्थानचे उपकार्यकारी अधिकारी नितीन शेटे यांनी संपवलं आयुष्य
8
Mumbai : 'Mhada अधिकाऱ्याची महिन्याला ४०-५० लाख काळी कमाई'; पत्नी वैतागली आणि संपवलं आयुष्य
9
"अल्लाह हू अकबर, विमानात बॉम्ब, मी तो उडवून देईन", प्रवाशाच्या धमकीनंतर विमानाचे आपत्कालीन लँडिंग
10
कुठे गायब झाली 'तेरे नाम'मधील भिकारीची भूमिका करणारी अभिनेत्री? पूर्ण बदललाय तिचा लूक
11
'मौन व्रत, मौन व्रत...', संसदेत बोलणाऱ्या काँग्रेस खासदारांच्या यादीतून शशी थरुर यांना वगळले
12
घरात मोठ्या आवाजात गाणी लावून पत्नीच्या डोक्यात टाकली वीट; हत्येनंतर पतीनेही संपवले जीवन
13
मेहनतीचं चीज! आई करते मजुरी, जेवणासाठी नव्हते पैसे, कोचिंगशिवाय ३ बहिणी UGC NET पास
14
जबरदस्त नफ्याचे संकेत देतोय GNG Electronics IPO चा GMP; शेअर्स अलॉट झालेत का, कसं चेक कराल?
15
परदेशात डॉक्टरी शिकून थेट भारतात प्रॅक्टीस करण्याचा मार्ग सोपा होणार; एनएमसी आणतेय नवे नियम...
16
आजीबाई जोमात, नागोबा कोमात; 8 फूट लांब सापाला अलगद पकडले, पाहा Video
17
IND vs ENG: "शुबमन गिलने जर शतक केलं नसतं तर..."; प्रशिक्षक गौतम गंभीरने ठणकावून सांगितलं
18
'हिंजवडी' हातची गेली तर तोटा कोणाचा? पुण्याचा की महाराष्ट्राचा...; १५ वर्षांत किती बदलली...
19
Shravan Somvar 2025: महादेवाला केतकीची फुले वाहू नये; त्यामागे आहे एक पौराणिक कथा!
20
'बॉर्डर २'मध्ये वरुण धवनसोबत झळकणार 'ही' अभिनेत्री, मेकर्सने केली अधिकृत घोषणा

भक्तांच्या सोनेरी श्रद्धेला तडे; योगेश्वरी देवीच्या दागिन्यांची चोरी ठरले केवळ राजकीय भांडवल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2020 12:40 IST

आठ वर्षाचा कालावधी लोटला तरी चोरीचा उलगडा नाही

ठळक मुद्देआठ वर्षापूर्वी १८ एप्रिल २०१२ च्या पहाटे झाली चोरीयोगेश्वरी देवीच्या अंगावरील ३१ तोळे सोने व तीन किलो चांदीचे दागिने

- अविनाश मुडेगांवकर 

 अंबाजोगाई - ‘चोरी केली की देव पाप देतो’ ही प्रचलित असलेली म्हण मात्र अंबाजोगाईकरांसाठी खोटीच ठरली. जिथे देवच सुरक्षित राहिला नाही. तिथे माणसांचं काय? असा प्रश्न श्री योेगेश्वरी देवीच्या दागिन्यांची झालेली चोरी, यातील निर्दोष सुटलेले आरोपी यावरून निर्माण झाला आहे. 

 आठ वर्षापूर्वी १८ एप्रिल २०१२ च्या पहाटे चोरट्यांनी श्री योगेश्वरी देवीच्या अंगावरील ३१ तोळे सोने व तीन किलो चांदीचे दागिने चोरून नेले. दिवेआगार व अंबाजोगाई येथील झालेल्या या चोरीने संपूर्ण महाराष्ट्रात मोठे काहूर माजले होते. चोरीचा तपास तत्कालीन पोलिस अधीक्षक डी. वाय मंडलिक यांनी स्वत:कडे घेतला होता. दागिने चोरणारे चोर पकडून आणावेत या मागणीसाठी अंबाजोगाईत बंद, मोर्चे, आंदोलने अशा विविध मार्गांनी भाविकांनी रोष व्यक्त केला होता. दागिन्यांविना देवी पाहणे भाविकांना न रुचल्याने चोरी गेलेल्या दागिन्यांपेक्षा तिप्पट दागिने भक्तांनी देवीला अर्पण केले. भाविकांची सोनेरी श्रद्धा देवीला भरभरून देऊन गेली. कै. गोपीनाथराव मुंडे यांनीही  चोरांचा तपास लावा, ही मागणी पुढे करीत देवीच्या दागिन्यांसाठी स्वत: हातात परडी घेऊन मदत फेरी अंबाजोगाई शहरातून काढली होती. एक सच्चा भक्त म्हणून मुंडेंनी तीन लक्ष रुपये परडीत जमा केले व उर्वरित रक्कम स्वत:ची घालून देवीला दागिने अर्पण केले.  देवीच्या दागिन्यांची झालेली चोरी व केज विधानसभेची पोटनिवडणूक या दोन्ही गोष्टी एकत्रित झाल्याने दागिन्यांच्या चोरीला राजकीय भांडवल म्हणून त्यावेळीच्या निवडणुकीत पाहिले गेले. निवडणुकीच्या प्रचारात चोरीचा मुद्दा मोठ्या प्रमाणात गाजला. तत्कालिन मंत्री सुरेश धस, धनंजय मुंडे, अक्षय मुंदडा, यांनीही ‘हम भी कुछ कम नही’ म्हणत गोपीनाथ मुंडे यांच्या पाठोपाठ देवीला दागिने अर्पण केले. निवडणुकीच्या प्रचारात चोरीचा तपास हा कळीचा मुद्दा बनला होता. अंबाजोगाई व दिवेआगार येथील झालेली चोरी , दोन्ही चोरीतील आरोपी  एकच असावेत असा कयास पोलिस प्रशासनाने बांधला व सलग दोन महिले विविध ठिकाणच्या आरोपींना चौकशीसाठी बोलावून धाडसत्र सुरूच राहिले. 

प्रशासनाचा दट्ट्या पोलिसांवर राहिल्याने चोर सोडून संन्याशाला फाशी अशा अनेक घटना या कालवाधीत घडल्या. मात्र खरे चोर कोण? हा प्रश्न अजूनही निर्दोष सुटलेल्या आरोपींमुळे गुलदस्त्यातच राहिला आहे.  दागिन्यांच्या चोरी प्रकरणातील पोलिसांनी पकडलेले आरोपी हे खरे आरोपी नाहीत याबाबत लोकमतने आवाज उठविला होता. अन् ती शंका न्यायालयाच्या निकालानंतर खरी ठरली. तब्बल एक वर्षे पोलिस तपास झाला. मात्र, पोलिसांच्या हाती काहीच लागले नाही. महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री योगेश्वरी देवीच्या भक्तांना चोरांना शिक्षांना व्हावी व दागिने परत मिळावेत अशी अपेक्षा बाळगून होते. मात्र ती अपेक्षाही फोल ठरली. चोरीची घटना होऊन आठ वर्षाचा कालावधी लोटला तरीही पोलिस प्रशासनाला आजही आठ वर्षा नंतर या बाबतीत यश आले नाही. ही रुखरुख भाविकांच्या मनाला कायम बोचरी ठरणारी आहे.

टॅग्स :theftचोरीBeedबीडPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी