एक हजाराची लाच घेताना शाखा अभियंता जाळ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:32 IST2021-04-06T04:32:40+5:302021-04-06T04:32:40+5:30
शेख समद नूर मोहम्मद (रा. शहागड, ता. अंबड, जि. जालना) असे अटक केलेल्या शाखा अभियंत्याचे नाव आहे. शेख ...

एक हजाराची लाच घेताना शाखा अभियंता जाळ्यात
शेख समद नूर मोहम्मद (रा. शहागड, ता. अंबड, जि. जालना) असे अटक केलेल्या शाखा अभियंत्याचे नाव आहे. शेख समद याने तक्रारदाराकडे ग्रामपंचायतीच्या शौचालय बांधकाम अंदाजपत्रकाच्या तांत्रिक मान्यतेसाठी १ हजाराची लाच मागितली होती. दरम्यान, याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधककडे केली. पथकाने सापळा रचून १ हजार रुपये स्वीकारताना शेख समद शेख मोहम्मद याला ताब्यात घेतले. शेख समद नूर मोहम्मद याच्याविरुद्ध लाच स्वीकारल्याप्रकरणी गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई डॉ. राहुल खाडे उपअधीक्षक, डॉ. अनिता जमादार, अपर अधीक्षक बाळकृष्ण हानपुडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि राजकुमार पाडवी, पोलीस अंमलदार हनुमंत गोरे, मनोज गदळे, प्रदीप वीर यांनी केली.