मुलानेच वडिलांवर केला कोयत्याने हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 04:23 IST2021-06-11T04:23:36+5:302021-06-11T04:23:36+5:30
प्रल्हाद उत्तम मुंडे (दौंडवाडी ता.परळी ) असे मुलाच्या मारहाणीत जखमी झालेल्या वडिलांचे नाव आहे. त्यांची दौंडवाडी शिवारात शेती आहे. ...

मुलानेच वडिलांवर केला कोयत्याने हल्ला
प्रल्हाद उत्तम मुंडे (दौंडवाडी ता.परळी ) असे मुलाच्या मारहाणीत जखमी झालेल्या वडिलांचे नाव आहे. त्यांची दौंडवाडी शिवारात शेती आहे. त्यांचा मुलगा वैजिनाथ प्रल्हाद मुंडे याने ‘शेत माझ्या नावावर करून दे’ अशी भांडणाची कुरापत काढत वडील प्रल्हाद मुंडे यांना जबर मारहाण केली. तसेच शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकीदेखील दिली. दरम्यान, प्रल्हाद मुंडे यांच्यावर कोयत्याने वार करत असताना त्यांची पत्नी व आरोपीची आई सोडवण्यासाठी आली असता, तो वार त्यांच्या बोटावर बसल्याने हाताचे बोट तुटले. त्यानंतर त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. याप्रकरणी ९ जून परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात वडील प्रल्हाद मुंडे यांच्या फिर्यादीवरून वैजिनाथ याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणाचा पुढील तपास पोलीस नाईक चाटे हे करत आहेत.