दोन्ही लसी परिणामकारक; पसंती मात्र कोविशिल्डलाच !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:23 IST2021-06-24T04:23:22+5:302021-06-24T04:23:22+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क बीड : जिल्ह्यात सध्या कोविशिल्ड लसीलाच जास्त पसंती दिली जात असल्याचे समोर आले आहे, तर दुसऱ्या ...

दोन्ही लसी परिणामकारक; पसंती मात्र कोविशिल्डलाच !
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : जिल्ह्यात सध्या कोविशिल्ड लसीलाच जास्त पसंती दिली जात असल्याचे समोर आले आहे, तर दुसऱ्या बाजूला कोव्हॅक्सिन या लसीचाही तुटवडा असून केवळ दुसरा डोस असणाऱ्यांनाच लस दिली जात असल्याचे सांगण्यात आले.
जिल्ह्यात आतापर्यंत ४ लाख ८२ हजार लोकांना लस टोचण्यात आली आहे. सुरुवातीला अल्प प्रतिसाद असल्याने लसीकरण संथ झाले होते. त्यानंतर गतीने सुरू झाले. परंतु मागील महिनाभरापासून १८ ते ४४ वयोगटातील लोकांना लस बंद केली होती. लसीचाही तुटवडा होता. त्यामुळे आकडा कमी दिसत होता. परंतु आठवड्यापासून अगोदर ३० वर्षांवरील व आता १८ वर्षांवरील प्रत्येकाला लस देणे सुरू केले आहे. असे असले तरी लसीचा तुटवडा असल्याने लसीकरणाची गती संथ असल्याचे दिसत आहे. आरोग्य विभागाकडून मात्र, गर्दी टाळण्यासह नियोजन केले जात आहे.
....
ॲपद्वारे ऑनलाईन नोंदणी करा
n गर्दी टाळण्यासाठी आरोग्य विभागाकडून इझी व निडली ॲपद्वारे लाभार्थ्यांची नोंदणी केली जात आहे.
n नोंदणी केल्यानंतर लोकांना टोकन क्रमांक दिला जातो. यात वेळ आणि दिनांक असतो. त्यानुसारच लस घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
n सध्या जिल्ह्यात आतापर्यंत ऑनलाईन नोंदणीचा फायदा झाल्याचे दिसत असून नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.
....
ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करावी
लसीकरण केंद्रावरील गर्दी टाळण्यासाठी ऑनलाईन नोंदणी बंधनकारक केलेली आहे. तसेच कोव्हॅक्सिनचा तुटवडा असल्याने कोविशिल्ड लस दिली जात आहे.
- डॉ. आर. बी. पवार, डीएचओ, बीड.