ठाण्यात तक्रार देण्यावरून दोघांवर तलवारीने वार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2018 00:21 IST2018-03-05T00:21:00+5:302018-03-05T00:21:09+5:30
धुलीवंदनाच्या दिवशी झालेल्या भांडणाची फिर्याद पोलीस ठाण्यात देत आसल्याच्या कारणाहुन दोघांवर तलवारीने वार केले. यातील एकाचे बोटे तोडली. ही घटना माजलगाव तालुक्यातील किट्टी आडगाव येथे घडली. याप्रकरणी माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात पाच जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

ठाण्यात तक्रार देण्यावरून दोघांवर तलवारीने वार
लोकमत न्यूज नेटवर्क
माजलगाव : धुलीवंदनाच्या दिवशी झालेल्या भांडणाची फिर्याद पोलीस ठाण्यात देत आसल्याच्या कारणाहुन दोघांवर तलवारीने वार केले. यातील एकाचे बोटे तोडली. ही घटना माजलगाव तालुक्यातील किट्टी आडगाव येथे घडली. याप्रकरणी माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात पाच जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
माजलगाव तालुक्यातील किट्टिआडगाव येथील सय्यद आकबर, शेख मुजिब शेख मुस्तफा यांना माजलगाव येथील कपिल मेंढके, रवि गायकवाड, अमोल शिंदे यांनी केलेल्या मारहानीची फिर्याद देण्यासाठी पोलीस ठाण्यात जात असल्याच्या कारणावरून शुक्रवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या दरम्यान फुलेपिंपळगाव शिवारात पैठण ते माजलगावकडे येणा-या जायकवाडी कॅनॉलवर झालेल्या भांडणाच्या कारणावरुन शेख मुसिर शेख मुस्तफा व अन्य एकास कपील मेंडके, रवि गायकवाड, अमोल शिंदे यांनी तलवारीने मारहान करुन गंभीर जखमी केली.
यातील शेख मुजिब शेख मुस्तफा याच्या डाव्या हाताचे दोन बोटे तोडले. तर सय्यद आकबर सय्यद बाबा याला गंभिर जखमी करुन प्राणघातक हाल्ला करुन जिवंत मारण्याचा प्रयत्न केला. जखमींना बीड व औरंगाबादला उपचारासाठी हलविण्यात आले आहे. याप्रकरणी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल झाला असून यातील रवि गायकवाडला बेड्या ठोकल्या आहेत.