बसला ओव्हरटेक करताना दोघांचा गेला जीव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:22 IST2021-02-05T08:22:48+5:302021-02-05T08:22:48+5:30

माजलगाव : पाथरीहून माजलगावकडे येणाऱ्या एसटी बसला ओव्हरटेक करण्याच्या नादात एका दुचाकीने समोरून येणाऱ्या दुसऱ्या दुचाकीला जोराची ...

Both died while overtaking the bus | बसला ओव्हरटेक करताना दोघांचा गेला जीव

बसला ओव्हरटेक करताना दोघांचा गेला जीव

माजलगाव : पाथरीहून माजलगावकडे येणाऱ्या एसटी बसला ओव्हरटेक करण्याच्या नादात एका दुचाकीने समोरून येणाऱ्या दुसऱ्या दुचाकीला जोराची टक्कर दिली. या अपघातात दोन युवक जागीच ठार झाले असून दुचाकीवरील बहीण-भाऊ गंभीर जखमी झाले आहेत.

महामार्ग २२२ वर शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या पेट्रोलपंपासमोर शनिवारी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. बसच्या पाठीमागे वडवणी तालुक्यातील देवगाव येथील युवक शुभम आनंद सुरवसे (वय २५) एकटाच येत होता. माजलगाव शहराजवळ राष्ट्रीय महामार्गावर पेट्रोलपंपाजवळ एसटीला ओव्हरटेक करण्याच्या नादात समोरून येणाऱ्या दुचाकीला त्याने जोराची धडक दिली. या अपघातात शुभम व गणेश गुलाब झेटे (वय २२,रा. घळाटवाडी) दोन्ही दुचाकीचालक ठार झाले. घळाटवाडी येथील बहीण-भाऊ पांडुरंग विष्णू शिंदे (वय २२ ) व कविता सूर्यकांत नरवडे (२५) हे सोबत गाडीवर येत होते. ते या अपघातात गंभीर जखमी झाले आहेत. दरम्यान, जखमींना बीड येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

Web Title: Both died while overtaking the bus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.