शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC च्या मुदत ठेवींत ८ महिन्यांत २ हजार कोटींनी घट; मागील ३ वर्षात १२ हजार कोटींची घसरण
2
रशियाने भारताला SU-57 लढाऊ विमानांची ऑफर दिली, त्याचे फिचर अन् महत्त्व जाणून घ्या
3
Aadhaar App :'आधार कार्ड'मध्ये बदल करणे होणार सोपे, नवीन अ‍ॅप लाँचच्या तयारीत;मिळणार खास फीचर
4
हाय गर्मी! उष्णतेचा प्रकोप जीवघेणा; युरोपमध्ये ६२,७०० जणांचा मृत्यू, वाढत्या तापमानाचा जगाला धोका
5
९४ मिनिटांचा थरार! विमानांच्या चाकांमध्ये लपून दिल्लीत आलेल्या अफगाणी मुलासोबत पुढे काय घडलं?
6
'चॅटजीपीटी'कडून बनावट नोटा तयार करण्याचे धडे; ५०० रुपयांच्या नोटा बनवल्या आणि बाजारातही वापरल्या
7
महिंद्रा, PNB आणि L&T... दिवाळीपूर्वी मोठी कमाईची संधी! बाजारातील 'हे' ५ शेअर्स ठरू शकतात गेमचेंजर
8
Ladki Bahin Yojana: २६ लाख लाडक्या बहिणींची नावे गायब, ४९०० कोटींचा महाघोटाळा; अजित पवारांच्या बहिणीचा गंभीर आरोप 
9
International: आता अमेरिकेचा हनुमानावरही आक्षेप; म्हणाले, 'खोट्या देवांची मूर्ती....'
10
VIRAL : एका झटक्यात महिला झाली कोट्यधीश; ChatGPTने पालटलं नशीब! वाचून व्हाल हैराण
11
३५० सीसीवरील मोटरसायकलचा जीएसटी वाढला; KTM, Triumph अन् Aprilia ने मोठा निर्णय घेतला...
12
घराशेजारच्या किराणा दुकानांमध्ये ‘GST बचत उत्सवा’चा लाभ नाहीच; ग्राहकांचा झाला अपेक्षाभंग
13
"महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करा, आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घ्या’ काँग्रेसची मागणी  
14
Ghaziabad Encounter: गाझियाबाद एन्काउंटरची इतिहासात नोंद, असं वेगळं काय घडलं? 
15
अर्जुन तेंडुलकर राहुल द्रविडच्या मुलाला भिडला; समित द्रविड पहिल्यांदाच खेळला, पण... 
16
मराठी माणसाचं दुकान हडपल्याचा गुन्हा; 'त्या' परप्रांतीयाला शिंदेसेनेकडून जबाबदारी, पक्षात नाराजी
17
"गरबा कार्यक्रमांच्या प्रवेशद्वारावर गोमूत्र ठेवावं, गैर-हिंदूंना..."; धीरेंद्र शास्त्रींचं मोठं विधान
18
मनसेची मान्यता रद्द करण्याची मागणी, राज ठाकरेंविरोधातील याचिकेवर उच्च न्यायालयाचे प्रश्नचिन्ह
19
दिल्लीतील रस्त्यावर मध्यरात्री चकमकीचा थरार, माया गँगच्या म्होरक्याविरोधात STF ची मोठी कारवाई
20
वयाच्या २९व्या वर्षी वेगवान गोलंदाज निवृत्त; वकील बनण्यासाठी क्रिकेटशी तोडलं नातं!

धाडसी दरोडा; वृद्धेची हत्या करून सव्वासात लाखांचा ऐवज लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2019 00:01 IST

शहरातील खडकपुरा भागातील (खक्का मार्केट) येथील एका घरात अज्ञात दरोडेखोरांनी सोमवारी रात्री प्रवेश करून घरातील नगदी ५ लाख रुपये व सोन्याचे दागिने असा एकूण ७ लाख २० हजारांचा ऐजज लंपास केला.

ठळक मुद्देगेवराई शहरातील खडकपुरा भागातील घटना : तपासासाठी पोलिसांची चार पथके रवाना

गेवराई : शहरातील खडकपुरा भागातील (खक्का मार्केट) येथील एका घरात अज्ञात दरोडेखोरांनी सोमवारी रात्री प्रवेश करून घरातील नगदी ५ लाख रुपये व सोन्याचे दागिने असा एकूण ७ लाख २० हजारांचा ऐजज लंपास केला. तसेच ६१ वर्षीय वृद्ध महिलेचा मोबाईलच्या चार्जरने गळा आवळून व वार करून निर्घृण हत्या केली. या घटनेने खळबळ उडाली असून सर्वत्र भीतीचे वातावरण आहे.

पुष्पाबाई शिवकुमार शर्मा असे मयत वृद्ध महिलेचे नाव आहे. त्या पाटबंधारे विभागातील सेवानिवृत्त सेवक होत्या. नेहमीप्रमाणे त्या घरातील माडी खालील खोलीत झोपी गेल्या. माडीवरील खोलीत दोन्ही मुले आपल्या कुटुंबांसमवेत झोपली होती. तर लहान मुलगा पंकज हा बाहेर गावी गेला होता.सोमवारी रात्री अज्ञात दरोडेखोरांनी घरात प्रवेश करून घरातील कपाटात ठेवलेले नगदी ५ लाख रुपये तसेच पुष्पाबार्इंच्या हातातील सोन्याच्या बांगड्या, कानातील झुंबर, साखळी तसेच कपाटात ठेवलेल्या अंगठ्या, गळयातील गंठण असा एकूण ७ लाख २० हजारांचा ऐजव लंपास केला. हा ऐवज लुटताना पुष्पाबाई शर्मा यांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्यावर हल्ला झाला. तसेच मोबाईलच्या चार्जरने गळा आवळून खून केला. त्यानंतर मुद्देमाल घेऊन चोरटे पसार झाले.सकाळी ६ वाजले तरी आई उठली का नाही, हे पाहण्यासाठी प्रवीण खाली आले. यावेळी त्यांना आई मृतावस्थेत पडलेली व कपाटातील सामान विखुरलेले आढळले. याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.येथील उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. या प्रकरणी गेवराई पोलीस ठाण्यात प्रवीण शर्मा यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा तपास पोलीस निरीक्षक बाळासाहेब बडे हे करीत आहेत. या घटनेमुळे शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे.दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक जी.श्रीधर, अप्पर पोलीस अधीक्षक विजय कबाडे, उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन भोसले, स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि दिलीप तेजनकर, अमोल धस, दरोडा प्रतिबंधकचे सपोनि गजानन जाधव, पोलीस निरीक्षक बाळासाहेब बडे या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली.ठसे तज्ज्ञ, श्वान पथकाला पाचारणदरोडेखोरांचा तपास करण्यासाठी पोलीस अधीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, दरोडा प्रतिबंधक पथक आणि गेवराई पोलीस असे चार पथके तयार केली आहेत. घटनेनंतर ते तात्काळ तपासासाठी रवाना झाल्याचे पोनि बडे यांनी सांगितले. तसेच घटनास्थळी ठसे तज्ज्ञ व श्वान पथकालाही पाचारण करण्यात आले होते.घाडगे दाम्पत्याच्या हत्या प्रकरणाने खळबळ२३ आॅगस्ट २०१७ रोजी शहरातील गणेशनगर भागातील आदिनाथ घाडगे व अलका घाडगे या दाम्पत्यावर हल्ला करून त्यांची हत्या दरोडेखोरांनी केली होती. तसेच एका मुलीला गंभीर जखमी करून लाखो रुपयांचा ऐवज लुटला होता. सहा महिन्यानंतर हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या मुलीचाही मृत्यू झाला होता. या घटनेने राज्यात खळबळ उडाली होती.

टॅग्स :BeedबीडRobberyदरोडाMurderखूनBeed policeबीड पोलीस