सौताडा येथे धबधब्याच्या बाजूला झाडाला लटकलेला मृतदेह आढळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 04:28 IST2021-01-09T04:28:37+5:302021-01-09T04:28:37+5:30
सौताडा-रामेश्वर हे पर्यटन स्थळ संपूर्ण महाराष्ट्रात गाजलेले असून येथील निसर्गरम्य धबधबा आहे. श्री क्षेत्र रामेश्वराचे दर्शन घेण्यासाठी हजारो ...

सौताडा येथे धबधब्याच्या बाजूला झाडाला लटकलेला मृतदेह आढळला
सौताडा-रामेश्वर हे पर्यटन स्थळ संपूर्ण महाराष्ट्रात गाजलेले असून येथील निसर्गरम्य धबधबा आहे. श्री क्षेत्र रामेश्वराचे दर्शन घेण्यासाठी हजारो भाविक रोज ये-जा करतात. ८ जानेवारी रोजी दुपारी तीनच्या सुमारास सौताडा वनखात्यातील वनरक्षक भाऊसाहेब पेचे, नवनाथ उबाळे हे नेहमीप्रमाणे जंगलात गस्त घालत असताना त्यांना मंदिराच्या उजव्या बाजूला छोट्या धबधब्याजवळ एका झाडाला अज्ञात मृतदेह लटकलेल्या अवस्थेत पाहण्यास मिळाला. हा मृतदेह अर्धा झाडाला तर अर्धा खाली पडलेल्या अवस्थेत असून हा खून की आत्महत्या? अशी चर्चा आहे.
अंगावर तीन गुडीचा शर्ट, धोतर, डोक्याला पंचा असा पेहराव असून साधारण ५५ ते ६० वय असू शकते. यावेळी वनरक्षक भाऊसाहेब पेचे यांनी पोलीस स्टेशन पाटोदा येथे फोनवरून खबर दिली आहे. संध्याकाळी सहाच्या दरम्यान पाटोदा पोलीस स्टेशनचे कॉन्स्टेबल तांदळे व तांबे, वन कर्मचारी भाऊसाहेब पेचे, नवनाथ उबाळे यांनी रामेश्वर धबधब्यांमध्ये आपल्या सहकाऱ्यांसमवेत दरीमध्ये उतरून प्रेताची पाहणी करून पंचनामा केला. यावेळी त्यामधील काही कागदपत्रांच्या आधारे मृत असलेला इसम त्यांचे नाव काशिनाथ बाबूराव मुळीक (राहणार करचूडी, तालुका जिल्हा बीड) हे असून नेमका हा खून आहे का आत्महत्या? याचा तपास एपीआय आंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली कॉ तांदळे व तांबे हे करत आहेत