बेपत्ता युवकाचा मृतदेह शेलगाव बंधा-यात आढळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:39 IST2021-09-24T04:39:40+5:302021-09-24T04:39:40+5:30

गेवराई : तालुक्यातील मनुबाई जवळा येथील बेपत्ता युवकाचा मृतदेह माजलगाव तालुक्यातील शेलगाव येथील बंधा-यात गुरुवारी सकाळी पाण्यात आढळुन ...

The body of a missing youth was found in Shelgaon dam | बेपत्ता युवकाचा मृतदेह शेलगाव बंधा-यात आढळला

बेपत्ता युवकाचा मृतदेह शेलगाव बंधा-यात आढळला

गेवराई : तालुक्यातील मनुबाई जवळा येथील बेपत्ता युवकाचा मृतदेह माजलगाव तालुक्यातील शेलगाव येथील बंधा-यात गुरुवारी सकाळी पाण्यात आढळुन आला. या प्रकरणी उशिरापर्यंत तलवाडा पोलीस ठाण्यात नोंद झाली नव्हती.

महेश जालिंदर कासार (वय १९, रा. मनुबाई जवळा) असे मृतदेह आढळलेल्या युवकाचे नाव असून तो मनुबाई जवळा येथून २१ सप्टेंबर रोजी बेपत्ता झाला होता. याबाबतची नोंद तलवाडा पोलीस ठाण्यात करण्यात आली होती. याचा तपास सहायक फौजदार महेंद्रसिंग चव्हाण यांच्याकडे देण्यात आला होता. दरम्यान गुरुवारी माजलगाव तालुक्यातील शेलगाव येथील शेतकरी शेतात जातांना त्यांना गोदावरी नदी पात्रातील बंधा-यात मृतदेह तरंगत असल्याचे दिसले. त्यांनी ही माहिती पोलिसांना दिली. तलवाडा पोलीस ठाण्यात बेपत्ता असलेला युवकाचाच मृतदेह असल्याची खात्री पटली.

230921\sakharam shinde_img-20210923-wa0021_14.jpg

Web Title: The body of a missing youth was found in Shelgaon dam