केज नदीपात्रात सापडला मृतदेह - A
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:29 IST2021-02-08T04:29:02+5:302021-02-08T04:29:02+5:30
केज : येथील अल्लाउद्दीन नगरच्या जवळून वाहणाऱ्या लेंडी नदीत एका पुरुषाचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडली आहे. येथील भीमनगरलगतच्या ...

केज नदीपात्रात सापडला मृतदेह - A
केज : येथील अल्लाउद्दीन नगरच्या जवळून वाहणाऱ्या लेंडी नदीत एका पुरुषाचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडली आहे. येथील भीमनगरलगतच्या स्मशानभूमीजवळून वाहणाऱ्या लेंडी नदीपात्रात दिनांक ६ फेब्रुवारी रोजी शनिवारी अंदाजे ४५ वर्षे वयाच्या पुरुषाचा अनोळखी मृतदेह पालथ्या अवस्थेत पाण्यावर तरंगत असल्याचे शेख युन्नूस चांद व गुलाब गुंड यांना ते दुपारी शेतात गेले असता दिसला. त्यांनी याची माहिती केज पोलीस ठाण्यात देताच, सहायक पोलीस निरीक्षक संतोष मिसळे, पोलीस उपनिरीक्षक दादासाहेब सिद्धे, रुक्मिणी पाचपिंडे, आशा चौरे तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयातील आय-बाईक विभागाचे कर्मचारी वैभव राऊत व पप्पू अहंकारे घटनास्थळी दाखल झाले. हा मृतदेह पाण्याबाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू असून, मृत व्यक्तीची ओळख पटवण्याचे काम पोलीस करत आहेत. याप्रकरणी केज पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे.