‘लोकमत रक्ताचं नातं’ मोहिमेंतर्गत धारूर येथे आज रक्तदान शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:42 IST2021-07-07T04:42:19+5:302021-07-07T04:42:19+5:30
बीड : लोकमतचे संस्थापक संपादक, स्वातंत्र्यसंग्राम सेनानी स्व. जवाहरलालजी दर्डा ऊर्फ बाबूजी यांच्या जयंतीनिमित्त लोकमत वृत्तपत्र समूहाच्या वतीने ७ ...

‘लोकमत रक्ताचं नातं’ मोहिमेंतर्गत धारूर येथे आज रक्तदान शिबिर
बीड : लोकमतचे संस्थापक संपादक, स्वातंत्र्यसंग्राम सेनानी स्व. जवाहरलालजी दर्डा ऊर्फ बाबूजी यांच्या जयंतीनिमित्त लोकमत वृत्तपत्र समूहाच्या वतीने ७ जुलै रोजी धारूर येथे सकाळी दहा ते पाच या वेळेत डॉ. पी. एस. मुंडे यांचे रुग्णालय, वीरशैव लिंगायत मठ, क्रांती चौक, किल्ले धारूर येथे रक्तदान शिबिराचे आयोजन केलेले आहे.
बीड, परळी, अंबाजोगाई, नेकनूर नंतर आता ऐतिहासिक शहर धारूर येथे बुधवारी हे रक्तदान शिबिर होत आहे. किल्ले धारैर युथ क्लब, किल्ले धारूर रोटरी क्लब, कायाकल्प फाउंडेशन, श्रीहर्ष प्रतिष्ठान, वसुंधरा मित्र मंडळ, भ्रष्टाचार निर्मूलन समिती, श्री हनुमान मित्र मंडळ, नवक्रांती युवक मंडळ, वसुंधरा मित्रमंडळ किल्लेधारूर या सामाजिक संस्थेच्या सहकार्याने या रक्तदान शिबिराचे आयोजन केलेले आहे. जास्तीत जास्त दात्यांनी रक्तदान करून रुग्णांचा जीव वाचवून एक आदर्श सामाजिक उपक्रम घडवून आणावा, असे आवाहन संयोजकांतर्फे करण्यात आले आहे.
रक्तदानासाठी यांच्याशी संपर्क साधा
अनिल महाजन ९९२२९९९६७१, गौतम शेंडगे ९८६०६२१२९८, संजित कोमटवार ९४२२४६७८८९, दिनेश कापसे ९४२३१७१७७८, विजय शिनगारे ९४२३६९२८१८, सादेक इनामदार ९६९३१६१६१६, मदनराव धोत्रे ९४२३३४२९८९, अमरजित तिवारी ९७७०३८८३३८, रोहन हजारी ९९२१९४६००७ या क्रमांकावर रक्तदान शिबिरासाठी संपर्क साधावा.
शुक्रवारी आष्टी येथे रक्तदान शिबिराचे आयोजन
आष्टी : ‘लोकमत रक्ताचं नातं’ या रक्तदान मोहिमेंतर्गत ९ जुलै रोजी आष्टी येथील जिल्हा परिषद माध्यमिक मुलांची शाळा पोलिस ठाणे शेजारी येथे जीवनराज चॅरिटेबल फाउंडेशन अहमदनगर ब्लड बँकच्या रक्तपेढीच्या सहकार्याने सकाळी १० वाजता रक्तदान शिबिरास प्रारंभ तर सायंकाळी ५ वाजता समारोप करण्यात येणार आहे. शहरातील व तालुक्यातील विविध सामाजिक संघटना व रक्तदात्यांनी या मोहिमेत सहभाग नोंदवावा , असे आवाहन लोकमत परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.
कोरोना विषाणू संसर्गाच्या संकट काळात रक्तदानाचे कार्य बहुतांशी थांबले होते . त्यामुळे रक्ताची कमतरता जाणवायला लागली. ती भरून काढण्यासाठी ‘लोकमत’ने पुढाकार घेतला असून २ जुलै ते १४ जुलै या कालावधीत ‘लोकमत रक्ताचं नातं’ ही अभिनव मोहीम हाती घेण्यात आली आहे . कोरोना काळात रक्ताची गरज असताना रक्ताचा तुटवडा राज्यभरात भासत आहे. त्यासाठी जिल्हाभरात घेण्यात येणाऱ्या रक्तदानाच्या महायज्ञात सहभागी होऊन सामाजिक बांधिलकी जोपासावी, असे आवाहन केले जात आहे .
रक्तदानासाठी यांचे आवाहन
आष्टी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक मित्र मंडळ, व्यापारी असोसिएशन, बी.डी. हंबर्डे महाविद्यालय, सहकार प्रतिष्ठान, पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालय, आर्यन्स ग्रुप, साहेब प्रतिष्ठान महाराष्ट्र, आष्टी तालुका युवा पत्रकार संघ, टायगर ग्रुप, जिवा महाले युवा मंच, महात्मा फुले प्रतिष्ठान, अटल क्रीडा मंडळ सुलेमान देवळा, पोलीस दक्षमित्र, शिवराजे ग्रुप कडा यांच्यासह विविध सामाजिक संघटना, सामाजिक कार्यकर्ते या रक्तदानाच्या मोहिमेत सहभागी होणार आहेत. या सर्वांनी रक्तदान करण्यासाठी आवाहन केले आहे. ज्यांना रक्तदान करायचे आहे, त्यांनी अविनाश कदम - ९४२३३९५४४४ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन लोकमत परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे