संभाजी ब्रिगेडच्या रक्तदान शिबिरात ६६ जणांचे रक्तदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:35 IST2021-05-18T04:35:02+5:302021-05-18T04:35:02+5:30

परळी : छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त संभाजी ब्रिगेडच्यावतीने रक्तदान शिबिर घेण्यात आले. यात परळी शहर परिसरातील ६६ रक्तदात्यांनी ...

Blood donation of 66 people in Sambhaji Brigade's blood donation camp | संभाजी ब्रिगेडच्या रक्तदान शिबिरात ६६ जणांचे रक्तदान

संभाजी ब्रिगेडच्या रक्तदान शिबिरात ६६ जणांचे रक्तदान

परळी : छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त संभाजी ब्रिगेडच्यावतीने रक्तदान शिबिर घेण्यात आले. यात परळी शहर परिसरातील ६६ रक्तदात्यांनी रक्तदान केले.

शिबिराचे उद्‌घाटन संभाजी ब्रिगेडचे विभागीय अध्यक्ष राहुल वायकर यांच्याहस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी प्रवीण ठोंबरे होते. संभाजी ब्रिगेडचे जिल्हा कार्याध्यक्ष छत्रभुज देशमुख, डॉ. वसंत उंबरे, तुकाराम कागदे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयाच्या डॉ. मंजुषा देशमुख, डॉ. शशिकांत पारखे, जगदीश रामदासी, शेख बाबा यांच्या टीमने रक्तदान शिबिराची उत्तमरित्या जबाबदारी पार पाडली.

शिबिर यशस्वी करण्यासाठी संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष देवराव लुगडे, सेवकराम जाधव, नामदेव भालेराव, अंकुश जाधव, संजय देशमुख, ईश्वर सोनवणे, आबा शिंदे, बाळासाहेब सोनवणे, राजेश पवार, महादेव साबळे, प्रदीप पिंपळे, कृष्णा पवार, प्रतीक देशमुख, प्रशांत अलटे, संदीप पाटील, बंकट उपाडे, श्रीनिवास तिडके, गोविन्द तिडके, रंजित मुंडे, ज्ञानोबा लोणकर, गणेश मुंडे, भागवत मोरे यांनी परिश्रम घेतले.

Web Title: Blood donation of 66 people in Sambhaji Brigade's blood donation camp