काँग्रेसच्या शिबिरात ४७ जणांचे रक्तदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 05:03 IST2021-02-06T05:03:00+5:302021-02-06T05:03:00+5:30
जनतेने रक्तदान करावे, असे आवाहन काँग्रेस पक्षाच्या वतीने जिल्हाध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी केले. यात महाविकास आघाडीचे सर्व घटक ...

काँग्रेसच्या शिबिरात ४७ जणांचे रक्तदान
जनतेने रक्तदान करावे, असे आवाहन काँग्रेस पक्षाच्या वतीने जिल्हाध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी केले. यात महाविकास आघाडीचे सर्व घटक पक्ष, स्वयंसेवी संस्था, सामाजिक संघटना, शिक्षण संस्था यांसह समाजातील सर्व घटकांनी रक्तदानासाठी पुढाकार घ्यावा, असे जाहीर आवाहन केल्यानंतर या आवाहनाला प्रतिसाद देत सामाजिक कार्यकर्ते अर्जुन बापू काळे, प्रताप देवकर, शरद काळे, सिद्धार्थ साबळे यांनी पुढाकार घेऊन सकारात्मक प्रतिसाद देत ४७ जणांनी रक्तदान केले.
यावेळी डॉ. राजेश कचरे, डॉ. राकेश जाधव, डॉ. विश्वजीत पवार, नगरसेवक मनोज लखेरा, नगरसेवक सुनील व्यवहारे, राणा चव्हाण, दत्ता सरवदे जगन सरवदे, सय्यद ताहेर, प्रताप देवकर, शरद काळे, सिद्धार्थ साबळे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती. या शिबिराच्या यशस्वितेसाठी अर्जुन बापू काळे मित्रमंडळाचे शेख अफीक, सचिन खरटमोल, लक्ष्मण वाघमारे, सचिन होके, सोहन अहिरे, सौरभ चव्हाण, नयन गायकवाड, शंकर साठे, रोहित साठे, ईश्वर काळे, सेवक खरटमोल, अभिमान साबळे, शंकर मुकुंद साठे, गणेश होके, अविनाश होके, कुंदन काळे, नितीन साठे आदींनी पुढाकार घेतला. शिबिरानंतर रक्तदात्यांना प्रमाणपत्रही देण्यात आले.
सामाजिक कार्यकर्ते अर्जुन बापू काळे यांनी येथील स्वामी रामानंद तीर्थ शासकीय वैद्यकीय रुग्णालयातील बालरोग विभागास दोन नेब्युलायझर मशीन व ओपीडी विभागास एक बीपी ऑपरेटर मशीन भेट स्वरुपात दिली. सामाजिक जाणीवेतून बांधिलकी जोपासत अतिशय स्तुत्य उपक्रम राबविण्यात आल्याबद्दल अर्जुन काळे व शरद काळे यांचे अनेकांनी स्वागत केले आहे.
बीड जिल्ह्यात काँग्रेस पक्षाच्या वतीने सातत्याने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे. या सर्व शिबिरांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. स्वामी रामानंद तीर्थ शासकीय वैद्यकीय रुग्णालय रक्तपेढी विभाग यांच्या गरजेनुसार व मागणीप्रमाणे टप्प्याटप्प्याने रक्तदान शिबिर आयोजित केले जात आहे. अर्जुन बापू काळे, प्रताप देवकर, शरद काळे, सिद्धार्थ साबळे यांच्या पुढाकाराने ४७ जणांनी रक्तदान केले.
राजकिशोर मोदी (अध्यक्ष, बीड जिल्हा काँग्रेस कमिटी)