केजमध्ये २१ दात्यांचे रक्तदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:31 IST2021-03-25T04:31:04+5:302021-03-25T04:31:04+5:30

केज : शहीद दिनानिमित्त रोटरी क्लब ऑफ केजच्या वतीने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात २१ दात्यांनी रक्तदान केले. अंबाजोगाई ...

Blood donation of 21 donors in the cage | केजमध्ये २१ दात्यांचे रक्तदान

केजमध्ये २१ दात्यांचे रक्तदान

केज

: शहीद दिनानिमित्त रोटरी क्लब ऑफ केजच्या वतीने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात २१ दात्यांनी रक्तदान केले.

अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालयाच्या शासकीय रक्तपेढीत रक्ताचा तुटवडा निर्माण झाल्याने केज रोटरीने तातडीने रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. जगदीश जोगदंड यांच्या हस्ते शिबिरात प्रथमच रक्तदान करणाऱ्या युवतींचा सत्कार करण्यात आला. या शिबिरात बापूराव सिंगण, मोहन गुंड, प्रा प्रकाश खुळे, प्रमोद पवार, सोमेश शिंदे, मयूर मांडलिया, गणेश शेटे, सत्यम नखाते, दिग्विजय नखाते, गणेश नेहरकर, सचिन नेटके,प्रभा ठोंबरे, ज्ञानेश्वर सोळुंके, मीनाक्षी दौड, अशोक सिंगण, संकेत देशमुख, दत्ता झाटे, सुरेश अंबाड, अजय एखंडे, प्रणित गिरी व अस्मिता अजय एखंडे आदींनी रक्तदान केल. यावेळी अस्मिता एखंडे व अजय एखंडे या दाम्पत्यांनी रक्तदान केले. शिबीर यशस्वी करण्यासाठी रोटरी क्लब ऑफ केजचे अध्यक्ष हनुमंत भोसले, सचिव धनराज पुरी, प्रोजेक्ट चेअरमन बापूराव सिंगण, शोभा जाधव, माजी अध्यक्ष विकास मिरगणे, सीता बनसोड, अरुण अंजान, दादा जमाले यांच्यासह क्रांतिसिंह नाना पाटील प्रतिष्ठान व संस्कार प्रतिष्ठानच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.

===Photopath===

230321\3706deepak naikwade_img-20210323-wa0012_14.jpg

Web Title: Blood donation of 21 donors in the cage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.