धारूरमध्ये १८२ दात्यांचे रक्तदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:45 IST2021-06-16T04:45:33+5:302021-06-16T04:45:33+5:30
धारूर : येथील बालाघाट प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित शिबिरात १८२ दात्यांनी उत्स्फूर्त रक्तदान करत विक्रम नोंदविला. कॅप्टन ...

धारूरमध्ये १८२ दात्यांचे रक्तदान
धारूर : येथील बालाघाट प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित शिबिरात १८२ दात्यांनी उत्स्फूर्त रक्तदान करत विक्रम नोंदविला. कॅप्टन राजपालसिंह हजारी यांच्या २४व्या पुण्यतिथीनिमित्त नगराध्यक्ष डॉ. स्वरूपसिंह हजारी यांच्या मार्गदर्शनाखाली येथील नगरेश्वर मंगल कार्यालयात या शिबिराचे आयोजन केले होते.
प्रारंभी कॅ. राजपालसिंह हजारी व लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. व्यासपीठावर नगराध्यक्ष डॉ. स्वरूपसिंह हजारी, मुख्याधिकारी नितीन बागुल, ज्येष्ठ नागरिक प्रमोदकुमार तिवारी, डॉ. ज्ञानोबा मुंडे, डॉ. तुकाराम मुंडे, डॉ. राम शिनगारे, प्रकाश काळे, सदानंद खिंडरे, संदीपान तोंडे, अतुल शिनगारे, नाथा ढगे, व्यापारी संघाचे अध्यक्ष अशोक जाधव, गटनेते सुधीर शिनगारे, नगरसेवक संतोष सिरसट, चोखाराम गायसमुद्रे, उपनगराध्यक्ष बाळासाहेब गायकवाड आदी उपस्थित होते. शिबिराला दरवर्षीप्रमाणे प्रतिसाद मिळाला. विक्रमी रक्तदान करून बालाघाट प्रतिष्ठानने धारूर शहराचे नाव संपूर्ण महाराष्ट्रात गाजवल्याचे नगराध्यक्ष डॉ. हजारी म्हणाले. यावेळी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन युवा मोर्चाचे ॲड. मोहन भोसले यांनी केले. बालाघाट प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा नगराध्यक्ष डॉ. स्वरूपसिंह हजारी यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नगरसेवक सचिन दुबे, रोहित हजारी, शेख एजाज, संतोषसिंह पवार, रवि कुंभार आदींनी परिश्रम घेतले.
===Photopath===
140621\img_20210614_104810.jpg
===Caption===
बालाघाट प्रतीष्ठानने आयोजीत रक्तदान शिबीरात 182 जनाचे रक्तदान