गेवराईत १५० जणांचे रक्तदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:31 IST2021-04-12T04:31:27+5:302021-04-12T04:31:27+5:30

गेवराई : कोरोना परिस्थितीमुळे शासकीय रक्तपेढीमध्ये रक्ताचा साठा कमी पडू लागला आहे. हे लक्षात घेऊन रविवारी आसरा फाऊंडेशन व ...

Blood donation of 150 people in Gevrai | गेवराईत १५० जणांचे रक्तदान

गेवराईत १५० जणांचे रक्तदान

गेवराई : कोरोना परिस्थितीमुळे शासकीय रक्तपेढीमध्ये रक्ताचा साठा कमी पडू लागला आहे. हे लक्षात घेऊन रविवारी आसरा फाऊंडेशन व गेवराई किराणा व्यापारी संघटनेने रक्तदानासाठी पुढाकार घेतला. बेदरे लॉन्स येथे झालेल्या शिबिरात १५० व्यापारी बांधवांनी रक्तदान केले. रविवारी सकाळी ८ ते दुपारी २ वाजेपर्यंत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नगराध्यक्ष सुशील जवंजाळ,नगरसेवक मोमीन मोझम, किराणा व्यापारी संघटनेचे अध्यक्ष सुरेश बरगे, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष प्रताप खरात, सचिव सुरेंद्र रुकर, आरसा फाऊंडेशनचे अभिजित काला, रवींद्र रूकर, ज्ञानेश्वर महाजन, दिलीप गंगवाल, गौतम चतुरमोहता, शैलेश तोष्णीवाल, संजय सोनी, रोहित फुलशंकर, रोहित वरपे, प्रमोद गगंवाल, अविनाश डेरे, पंढरीनाथ निवारे, दत्ता गरड, अक्षय मारोटे, सुरेश देशमाने, दीपक खंडागळे, अजिंक्य जैन, सुरेश मानधनेसह आसरा फाऊंडेशन व किराणा संघटनेचे अनेक जण उपस्थित होते. यावेळी रक्तदात्यांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.

फोटो : गेवराईत आसरा फाऊंडेशन व किराणा व्यपारी संघटनेने आयोजित केलेल्या शिबिरात दात्यांनी उत्स्फूर्त रक्तदान केले. यावेळी रक्तदान करणाऱ्या दात्यांना प्रमाणपत्र वितरण करण्यात आले.

===Photopath===

110421\20210411_105220_14.jpg~110421\20210411_105007_14.jpg

Web Title: Blood donation of 150 people in Gevrai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.