शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

काळविटाचे शिकारी अडकले पोलिसांच्या जाळ्यात; मांसाची वाटणी करताना चौघे रंगेहाथ जेरबंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2024 18:23 IST

केज तालुक्यातील वरपगाव शिवारात पोलीसांचा छापा

- मधुकर सिरसटकेज :   काळविटाची शिकार करून त्याच्या मांसाची वाटणी करताना चौघांना पोलिसांनी तालुक्यातील वरपगाव येथील शिवारातून शनिवारी रात्री ताब्यात घेतले. याप्रकरणी केज पोलिस ठाण्यात तीन आरोपी आणि एका विधीसंघर्षग्रस्त बालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, शनिवारी ( दि. २४) स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उस्मान शेख यांना पोलीस उपनिरिक्षक मूरकुटे यांनी कळवले की, तालुक्यातील वरपगाव शिवारात बन्सी पवार याच्या पत्र्याच्या शेडमध्ये काळविटाची शिकार करुन मांसाची वाटणी सुरू आहे. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी सायंकाळी साडेसहा वाजता वरपगाव येथील शिवारातील शेडवर छापा मारला. यावेळी बन्सी पवारच्या पत्र्याच्या शेडमध्ये भैय्या बन्सी पवार, सुनिल ज्ञानोबा पवार, लाला शहाजी शिंदे आणि एक विधी संघर्षग्रस्त बालक काळवीटाच्या मासांचे हत्याराने तुकडे करताना आढळून आले. पोलिसांनी त्यांना रंगेहात पकडून दोन काळविटांचे शिंगे आणि हत्यारे जप्त केली. 

सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक हनुमान खेडकर यांच्या तक्रारीवरून भैय्या बन्सी पवार, सुनिल ज्ञानोबा पवार, लाला शहाजी शिंदे सर्वजण  रा वरपगाव यांचेसह एका विधीसंघर्षग्रस्त बालकाविरूद्ध केज पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील तीन आरोपींना रविवारी केज न्यायालयासमोर हजर केले आसता त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. तर विधीसंघर्षग्रस्त बालकास बीड येथील बाल सुधारगृहात पाठविण्यात आले आहे.

आठवड्यातील दुसरी घटना..आठ दिवसापूर्वीच कळत अंबा शिवारात एका काळविटाची शिकार करण्यात आली होती. याप्रकरणी पाच आरोपींना अटक करुन वन परिक्षेत्र कार्यालय धारुर येथे गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती वन परीक्षेत्र अधिकारी उत्तम चिवटे यांनी 'लोकमत'शी बोलताना दिली.

वन खात्याचे अधिकारी घटनास्थळी..विभागाचे मुख्य वनसंरक्षक हनुमंत धुमाळ आणि विभागीय वनाधिकारी ए डी गरकल यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त वनपाल नवनाथ पाईक, वनपरिक्षेत्र अधिकारी उत्तम चिकटे आणि वनपाल मोरे यांच्या आदेशाने वनमजूर वचिष्ट भालेराव, संभाजी पारवे, नवनाथ जाधव, वाहन चालक शाम गायसमुद्रे सिद्धेश्वर चव्हाण ऑपरेटर मनोज डोरनाळे, जीवन गोके यांनी  घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली.

टॅग्स :BeedबीडCrime Newsगुन्हेगारीforest departmentवनविभाग