शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

अंबाजोगाईत भाजपचे नशीब उजळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2019 00:06 IST

येथील नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षपदाचा पेच आठवडाभरापासून सुटत नव्हता. अखेर मंगळवारी दुपारी भाजपा, राष्ट्रवादी व कॉंग्रेस पक्षाच्या २२ नगर सेवकांनी एकत्र येऊन प्रत्येक पक्षाला नऊ-नऊ महिने उपाध्यक्ष पद वाटून घेतले.

ठळक मुद्देउपनगराध्यक्षाचा पेच सुटला : भाजपा, काँग्रेस, राष्टवादी काँग्रेसने कालखंड वाटून घेतले

अंबाजोगाई : येथील नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षपदाचा पेच आठवडाभरापासून सुटत नव्हता. अखेर मंगळवारी दुपारी भाजपा, राष्ट्रवादी व कॉंग्रेस पक्षाच्या २२ नगर सेवकांनी एकत्र येऊन प्रत्येक पक्षाला नऊ-नऊ महिने उपाध्यक्ष पद वाटून घेतले. प्रथम उपाध्यक्ष पद कोणाला याच्या चिठ्ठ्या टाकल्या असता सहा नगरसेवक असतानाही चिठ्ठीतून भाजपचे नशीब उजळले. बुधवारी उपाध्यक्ष निवडीची तारीख जाहीर होणार आहे.उपनगराध्यक्ष सारंग पुजारी यांच्यावर स्वपक्ष राष्ट्रवादी, भाजप आणि कॉँग्रेस पक्षाच्या २२ नगर सेवकांनी एकत्र येऊन ७ मे रोजी अविश्वासाचा ठराव दाखल केला. तो बहुमताने मंजूरही झाला. मात्र आता उपाध्यक्षपद कोणाला यासाठी तिन्ही पक्षात जोरदार रस्सीखेच सुरु झाली. आठवडाभर हा तिढा सुटत नव्हता. मंगळवारी दुपारी २२ नगर सेवकांनी एकत्र येत उर्वरित प्रत्येकी नऊ महिने एका पक्षाला असे तीन वेळा उपाध्यक्ष पद वाटून घेण्याचा निर्णय घेतला. पहिल्यांदा उपाध्यक्षपद कोणाला याचा पेच सोडवण्यासाठी तिन्ही पक्षाच्या चिठ्ठ्या टाकण्यात आल्या. यात पहिली चिट्ठी भाजपची निघाली. तर दुसरी राष्ट्रवादी आणि तिसरी टर्म कॉंग्रेस पक्षाकडे राहिली. अशा पद्धतीने उप नगराध्यक्ष पद वाटून घेण्याचा अलिखित ठराव झाला. मुंदडा गट मात्र या सर्व प्रक्रि येपासून तटस्थ आहे. नगर परिषदेच्या निवडणूकीत १६ नगरसेवक राष्ट्रवादीचे निवडून आले. या नगरसेवकात मुंदडा व साठे असे दोन गट झाले. साठेकडे नऊ तर मुंदडा गटाकडे सहा, कॉंग्रेस पक्षाचे ७ व भाजपचे ६ असे सध्याचे पक्षीय बलाबल आहे. गटबाजीच्या राजकारणामुळे पक्षाची ताकद मोठी असतानाही राकाँमध्ये दोन गट पडले. सर्वात कमी संख्याबळ असतानाही चिठ्ठीत मात्र भाजपचे नशीब उजळले.भाजपमध्ये सहापैकी पाच इच्छुकभाजपचे अंबाजोगाई नगर पालिकेत सहा सदस्य आहेत. त्यापैकी पाच सदस्य उपाध्यक्ष होण्यासाठी इच्छुक आहेत.यात डॉ. अतुल देशपांडे, सुरेश कराड, सविता अनंत लोमटे, शिल्पा संजय गंभिरे आणि संगीता दिलीप काळे हे पाचही सदस्य उपनगराध्यक्षपदासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसले आहेत. हा निर्णय आता पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्यावर सोपवण्यात आला आहे.बुधवारी प्रक्रि या सुरूउपनगराध्यक्ष पदासाठी निर्माण झालेला पेच आठवड्यानंतर सुटला आहे. आता उपाध्यक्ष निवडीची अधिकृत प्रक्रि या बुधवारी जाहीर होणार आहे.न. प. च्या वतीने उपनगराध्यक्ष पदाची निवड करण्यासाठी सर्वसाधारण सभेची सूचना किमान पाच दिवस अगोदर सर्व सदस्यांना उपलब्ध होणे बंधनकारक असते.

टॅग्स :BeedबीडAmbajogaiअंबाजोगाईBJPभाजपाcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेस