शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

भाजपचं धक्कातंत्र: बीडमधून प्रीतम मुंडेंचा पत्ता कट, पंकजा मुंडे लढणार लोकसभा निवडणूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2024 20:03 IST

प्रीतम मुंडे यांच्या जागी त्यांच्याच भगिणी पंकजा मुंडे यांना लोकसभेच्या रिंगणात उतरवण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे.

BJP Maharashtra Candidates ( Marathi News ) : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने आपली दुसरी उमेदवार यादी काही क्षणांपूर्वी जाहीर केली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील २० उमेदवारांची नावे घोषित करण्यात आली असून यंदा भाजपने अनेक नव्या चेहऱ्यांना संधी दिल्याचं पाहायला मिळत आहे. बीडमध्ये मागील दोन टर्मपासून खासदार असेल्या प्रीतम मुंडे यांचा पत्ता कट करण्यात आला असून प्रीतम यांच्या जागी त्यांच्याच भगिणी पंकजा मुंडे यांना लोकसभेच्या रिंगणात उतरवण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे. याबाबतची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून रंगत होती. या चर्चेवर आज अखेर शिक्कामोर्तब झालं आहे.

पंकजा मुंडे यांचा २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत परळी मतदारसंघातून राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी पराभव केला. त्यानंतर झालेल्या विधानपरिषद आणि राज्यसभेच्या अनेक निवडणुकांवेळी पंकजा मुंडे यांचे नाव उमेदवारीसाठी चर्चेत आले होते. मात्र पंकजा यांचे पक्षाकडून पुनर्वसन केले गेले नाही. त्यामुळे पंकजा मुंडेंनी अनेकदा जाहीरपणे आपली नाराजी व्यक्त केली होती. मात्र आता थेट पंकजा मुंडे यांना लोकसभेची उमेदवारी देण्यात आली आहे.

दरम्यान, प्रीतम मुंडे यांना डावलून बीड लोकसभेची उमेदवारी स्वीकारण्यास सुरुवातीच्या काळात पंकजा मुंडे यांनी नकार दिला होता. याबाबत जाहीरपणे भाष्य करत मी माझ्या बहिणीच्या जागी उभी राहणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं. मात्र आता भाजप नेतृत्वाकडून आदेश आल्यानंतर त्यांनी लोकसभा निवडणूक लढण्यास तयारी दर्शवल्याचं दिसत आहे.

काही दिवसांपूर्वी दिले होते संकेत

शिरूरकासार येथील धाकटी अलंकापुरी सिद्धेश्वर संस्थानवर महाशिवरात्र सोहळ्याचा समारोप शनिवारी झाला. महंत स्वामी विवेकानंद शास्त्री यांचे काल्याचे कीर्तन सुरू असताना माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर हे भेट देऊन पुढे गेले. नंतर आ. बाळासाहेब आजबे, आ. सुरेश धस, माजी आ. भीमराव धोंडे, डॉ. ज्योती मेटे पाठोपाठ माजी मंत्री पंकजा मुंडे, खा. डाॅ. प्रीतम मुंडे यांनी हजेरी लावली. यावेळी पंकजा मुंडे यांनी सूचक वक्तव्य केलं होतं. लोकसभेसाठी माझी काळजी तुम्ही घ्या, नंतर तुमची काळजी मी घेते, असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं होतं. 

टॅग्स :beed-pcबीडPankaja Mundeपंकजा मुंडेlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४