शांतिवनच्या पाळण्यात बाळ ठेऊन जन्मदाते गायब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:35 IST2021-09-19T04:35:19+5:302021-09-19T04:35:19+5:30
आर्वी येथील शांतिवनमध्ये बेवारस, आत्महत्याग्रस्त शेतकरी तसेच वंचित घटकातील मुलांचे संगोपन केले जाते व शिक्षण दिले जाते. नकोशा असलेल्या ...

शांतिवनच्या पाळण्यात बाळ ठेऊन जन्मदाते गायब
आर्वी येथील शांतिवनमध्ये बेवारस, आत्महत्याग्रस्त शेतकरी तसेच वंचित घटकातील मुलांचे संगोपन केले जाते व शिक्षण दिले जाते. नकोशा असलेल्या नवजात अर्भकांना कोणीही रस्त्यावर टाकू नये, यासाठी शांतिवनने प्रकल्पासमोर पाळणा ठेवलेला आहे. त्यात १७ सप्टेंबर रोजी रात्री साडेदहा वाजता तीन ते साडेतीन वर्षेवयाचे बाळ सोडून अज्ञातांनी पोबारा केला. ही बाब निदर्शनास येताच प्रकल्पाच्या कर्मचारीशीला सुभाष गायकवाड यांनी शिरुर ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून अज्ञात माता-पित्याविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला.
....
शांतिवनमध्ये आश्रय
शिरुर पोलिसांनी १८ सप्टेंबर रोजी बाळाला बीडला बाल कल्याण समितीसमोर हजर केले. बाळाला शांतिवनमधील बालगृहात ठेवण्याचे आदेश देण्यात आले. हे बाळ सध्या शांतिवनच्या आश्रयाला असून तेथे त्याची योग्य ती काळजी घेतली जात आहे. घटनास्थळी पोलीस निरीक्षक सिध्दार्थ माने यांनी भेट दिली. जमादार भाउसाहेब शिरसाट हे तपास करत आहेत.